मुंबई : अजित पवार यांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. पत्रकार परिषदेला नेतृत्वाची संपूर्ण फळी कधी बसत नाही, असे सांगून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील गैरहजेरीच्या प्रश्नाला उत्तर दिले. (Ajit Pawar absent from press conference: Sharad Pawar told...)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन आज मागे घेतला. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर शरद पवार बोलत होते.
ते म्हणाले की, अजित पवार पत्रकार परिषदेला नसले तरी आमचे बाकीचे सहकारी उपस्थित आहेत. सहसा पत्रकार परिषदेला नेतृत्वाची संपूर्ण फळी कधी बसत नाही. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आज बैठक घेतली. त्यांनी ठराव केला. त्या ठरावात मी माझा निर्णय बदलावा, असा आग्रह त्यांनी सूचित केला. पक्षाच्या समितीने केलेला ठराव तो माझ्याकडे पोचविण्याचे काम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि अन्य राज्यांतील सहकारी यांनी एकत्रित येऊन केले. यासंबंधीच्या भावना त्यांनी माझ्याकडे स्पष्ट केल्या आहेत. त्यामध्ये पक्षाचे संपूर्ण नेते होते. कोणी आहे किंवा कोणी नाही, अशा प्रकारचा विचार करण्याची अजिबात गरज नाही.
माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपल्या प्रेमाने मी भारावून गेलो. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समितीने घेतलेला निर्णय माझ्यापर्यंत पोहोचविण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मी मागे घेत आहे, अशी घोषणाही शरद पवार यांनी या वेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणीही फुटणार नाही. आमच्या पक्षात अशी परिस्थिती नाही, तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती आमच्याकडे द्या. त्यासंदर्भातील खबरदारी आम्ही यापुढच्या काळात नक्की घेऊ, असेही पवार यांनी स्पष्ट केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.