Ajit Pawar News : सलग तिसऱ्या दिवशी अजित पवारांचे कार्यक्रम राखीव; काय आहे कारण?

Maratha Reservation Meeting : दोन दिवसांपासून अजितदादा सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सलग तिसऱ्या दिवशी सोमवारीही सर्व सार्वजनिक कार्यक्रम राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. दोन दिवसांपासून अजितदादांनी एकाही कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. परिणामी आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला तरी ते हजेरी लावणार का, अशी चर्चा सुरू झालेली आहे. (Latest Political News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित सह्याद्रीवर सोमवारी दुपारी १२ वाजता मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक आहे. लाठीचार्जच्या घटनेनंतर दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतलेला नाही. जालन्यातील प्रकारामुळे महायुतीतील राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा असल्याचे समजत आहे. यातच आता अजितदादांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती आहे. दरम्यान, बुलढाण्यातील शासन आपल्या दारी, पुण्यातील विविध कार्यक्रमांना गैरहजर राहिल्यानंतर आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पवार उपस्थित राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Ajit Pawar
Maratha Reservation Protest : तलाठी परीक्षेवर मराठा आंदोलनाचे सावट; राजेश टोपेंची मोठी मागणी

जालन्यातील मराठा आरक्षणासाठी शांततेत सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने राज्यभरात संतप्त वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने काटेवाडी (ता. बारामती) येथेही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकर्त्यांनी अजित पवारांना सरकारची साथ सोडण्याचे आवाहन केले.

Ajit Pawar
Manoj Jarange News : उपोषणकर्ते मनोज जरांगेंचा मोठा निर्णय ; आजपासून अन्नपाणी त्याग आंदोलन, ‎राज ठाकरे घेणार भेट

"अजितदादा, तुम्ही एक तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा तरी घ्या, नाही तर त्यांची साथ तरी सोडा. राज्यातील सकल मराठा समाज तुमच्याकडे खूप आशेने बघतो", अशी आग्रहाची मागणी काटेवाडीकरांनी केली आहे. यानंतर सोमवारी बारामती बंदचीही हाक देण्यात आली आहे. यातच मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचे आज सलग तिसऱ्या दिवशी सर्व कार्यक्रम राखीव का ठेवले, यावर उलटसुटल चर्चेला उधाण आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com