Maratha Reservation Protest : तलाठी परीक्षेवर मराठा आंदोलनाचे सावट; राजेश टोपेंची मोठी मागणी

Rajesh Tope On Talathi Exam In Maharashtra : मराठवाड्यातील एसटी बसेसच्या फेऱ्या बंदमुळे विद्यार्थ्यांना फटका
Rajesh Tope
Rajesh TopeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : जालन्यातील आंतरवली सराटी येथे मराठा समजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे राज्यभर तीव्र पडसात उमटू लागले आहे. लाठीमार झाल्यानंतर अनेक ठिकाणी रस्तारोको करत जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. परिणामी राज्यभरातील दळणवळावर परिणाम झालेला आहे. याचा फटका प्रवाशांसह विद्यार्थ्यांना बसला आहे. दरम्यान, राज्यात तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. आंदोलनाचे सावट या परीक्षार्थींवरही आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी माजी मंत्री राजेश टोपेंनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. (Latest Political News)

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, "राज्यात सोमवारी तलाठी भरती परीक्षा आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ठिकठिकाणी सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींना परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार आहे. मराठवाड्यातील एसटी बसेस सरकारने बंद केल्या आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होणार आहे. तलाठी भरती परीक्षेच्या ग्रामीण भागातील परीक्षार्थींना फटका बसू नये व त्यांची ससेहोलपट होऊ नये म्हणून ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्यात यावी," अशी मागणी राजेश टोपेंनी ट्विटद्वारे केली आहे.

Rajesh Tope
Udayanraje Bhosale News: खासदार उदयनराजेंच्या साताऱ्यात मराठा क्रांती मोठा मोर्चाचा निर्णय; सोमवारी 'बंद'ची हाक

राज्यात सुमारे साडेचार हजार पदांसाठी तलाठी भरती होत आहे. यासाठी साडेदहा लाखाहून अधिक अर्ज आलेले आहेत. यासाठी परीक्षार्थींकडून ९०० आणि एक हजार असे शुल्क आकराले आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी टप्प्याटप्प्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यात आता तलाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अनेक केंद्रावर गोंधळ झाल्याने परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला आहे. यातच शुक्रवारी मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमारामुळे राज्यात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. यातून कुठे बंद, रास्ता रोको कुठे जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

जालन्यातील मराठा आंदोलनाचा फटका एसटीला बसला आहे. अनेक ठिकाणी एसटी बस जाळण्यात आल्या आहे. तसेच आंदोलन चिघळू नये याची खबळदारी घेण्यासाठी मराठवाड्यातील एसटी बसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. परिणामी राज्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था कोलमडली आहे. यामुळे तलाठी परीक्षेसाठ एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वेळेवर पोहचण्यासाठी तालाठी परीक्षार्थींना मोठी कसरत करावी लागणार आहे. परिणामी अनेकांना परीक्षा देता येणार नसल्याची शक्यता असून ही परीक्षाच पढे ढकल्याची मागणी टोपेंनी केली आहे. आता तलाठी परीक्षेबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे परीक्षार्थींसह विरोधकांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com