Ajit Pawar & BJP : अजित पवारांचा फायदा की तोटा; बावनकुळेंनी गणितच मांडलं

Chandrashekhar Bawankule : राज्यात पुरेसे संख्यबळ असतानाही भाजपने अजित पवार यांना सोबत घेतले. याचाच फटका भाजपला बसल्याचा घणाघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित 'आर्गनायजर' या मासिकातून करण्यात आला आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत 'मिशन 45' चे लक्ष्य ठेवलेल्या भाजपप्रणित महायुतीला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. भाजपची 23 वरून थेट 9 जागांवर घसरगुंडी झाली आहे. भाजपच्या या स्थितीला उपमुख्यमंत्री अजित पवार कारणीभूत असल्याची टीका भाजपातूनच होऊ लागली आहे. मात्र अजित पवारांचा तोटा नाही तर फायदाच झाल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठासून सांगत मतांची आकडेवारीच मांडली.

लोकसभेत महायुतीला 17 जागांवर समाधान मानावे लागल्याने निवडणुकीच्या रणनीतीवर भाजपातूनच आक्षेप घेतला जात आहे. राज्यात पुरेसे संख्यबळ असतानाही भाजपने अजित पवार यांना सोबत घेतले. याचाच फटका भाजपला बसल्याचा घणाघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित 'आर्गनायजर' या मासिकातून करण्यात आला आहे. हे आरोप बावनकुळेंनी Chandrashekhar Bawankule फेटाळत अजितदादांमुळे गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतांची वाढ झाल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

बावनकुळे म्हणाले, अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. त्यांच्यामुळे भाजपच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भाजपला 2019 च्या तुलनेत यंदा मते वाढली आहेत. मात्र, जागा कमी झाल्या असल्याचेही सत्य आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतांची आकडेवारी मांडत केवळ आर्धा टक्का मताधिकाक्याने निकाल फिरल्याचे स्पष्ट केले होते. या मतांच्या आकडीवारीमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला 130 जागा मिळतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला होता.

Chandrashekhar Bawankule
Sunetra Pawar News : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; बारामतीला मिळाला तिसरा खासदार

'ऑर्गनायझर'मधून केलेल्या टीकला अजित पवार Ajit Pawar गटाचे नेते छगन भुजबळांनी मात्र दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, मासिकातून अनेकांना धारेवर धरले आहे. भाजपने गरज नसतानाही, अजित पवार, काँग्रेसचे काही लोक सोबत घेतले. यात अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना तर राज्यसभेवरही पाठवले. त्यामुळे ते म्हणतात ते एकंदरीत बरोबरच आहे, असे भुजबळांनी थेट सांगितल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

यानंतर भुजबळांनी, मासिकात फक्त राज्यातील स्थितीकडे लक्ष दिलेले आहे. देशातील इतर भाजपला फटका बसलेलाच आहे. बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेलंगणातील चंद्राबाबू नायडू यांनाही सोबत घेऊनच आज सरकार स्थापन करावे लागले आहे, याकडेही भुजबळांनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

Chandrashekhar Bawankule
Rajabhau Waje : लोकसभेनंतर विधानपरिषद; आचारसंहितेच्या बेड्यांना राजाभाऊ वाजे वैतागले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com