Ajit Pawar NCP : लोकसभेला निराशाजनक कामगिरी; आता अजितदादांचा पहिलाच पण मोठा बदल..

Ajit Pawar Change for Vidhansabha Election : महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुलाबी रंगाचा वाढता वापर
Ajit Pawar NCP Rally
Ajit Pawar NCP RallySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत फक्त एका जागेवर समाधान मानावे लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने सर्वात आधी 'इमेज बिल्डिंग'चे काम एका संस्थेला दिले. आता त्यानुसार एक-एक बदल पक्षासह अजितदादांत दिसून येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे पक्षात वाढलेला गुलाबी रंगाचा वापर.

लोकसभा निवडणुकीत 'सायलंट' मतदार असलेल्या महिलांनी निकालाला कलाटणी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता त्याच महिला मतदारांना 'टार्गेट' करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहिराती, ग्राफिक्समधे गुलाबी रंगाचा वापर वाढवल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवार Ajit Pawar यांनीही आपल्या दैनंदिन वापरातील कपड्यात गुलाबी रंगाची छटा असणारे जॅकेट वापरण्यास सुरूवात केली आहे. संपूर्ण अधिवेशन कालावधीत अशाच प्रकारचा त्यांचा पेहराव पाहायला मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्याने नेमलेल्या नरेश अरोरा यांच्या टीमने कँपेनिंगचा भाग म्हणून अशा प्रकारचा पेहराव करण्यास सांगितल्याची माहिती आहे. तसेच अजित पवार यांचा चेहरा सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकणारा असावा, यासाठीच सिद्धीविनायक दर्शनासाठी सर्व आमदारांना घेऊन जाण्याचा प्लॅन देखील आयोजित करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.

Ajit Pawar NCP Rally
Imtiyaz Jaleel : मुलगा आंदोलकांना चिथावणी देतो; वडील शांततेच आवाहन करतात! शाहू महाराजांच्या कोल्हापुरात हे योग्य आहे का ?

काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान रॅलीची सभा पार पडली. त्यावेळी अजित पवारांची छबी महिलांना अनुकूल असल्याचे दाखवण्यासाठी गुलाबी रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. त्यात अनेक बॅनर, अजितदादांचे जॅकेट, तसेच अजित पवार यांच्या फोटोतही गुलाबी रंग दिसून आला. तो मेळावा फक्त राष्ट्रवादीचा असल्याने त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोंना स्थान नव्हते.

अजितदादांसाठी काम करणारी डिजाईन बॉक्स कंपनी

नरेश अरोरा यांची डिजाईन बॉक्स ही कंपनी आहे. या कंपनीने या आधी कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार यांच्यासाठी काम केलेले आहे. त्यानंतर अशोक गेहलोत यांच्यासाठी राजस्थानमध्ये काम केले होते. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही कंपनी काम करत आहे. त्यानुसार राष्ट्रवादी पक्षाने लक्षणीय बदल करण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar NCP Rally
Supriya Sule : भाजपची विधानसभेची तयारी; सुप्रिया सुळेंनी कळीच्या मुद्यावरच ठेवलं बोट, म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com