Ajit Pawar Vs Sanjay Raut : संजय राऊतांचा विषय अजितदादांनी एका सेकंदातच संपवला; म्हणाले...

Maharashtra Political News : अजित पवार संजय राऊतांवर भाष्य करणे टाळतात का ?
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी वारंवार विविध वक्तव्ये केली आहेत. एकनाथ शिंदेंना पायउतार करून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची भाजपची रणनीती असल्याचे राऊत ठासून सांगतात.

यावर पवारांनी राऊतांना कडक शब्दांत सुनावले असले तरी अशी विधाने काही थांबली नाहीत. परिणामी अजित पवार हे राऊतांवर जास्त बोलणे टाळतात, असेही दिसून येते. यातच शुक्रवारी राऊतांच्या एका दाव्यावर छेडले असता, पवारांनी एका सेकंदातच तो विषय संपवून दुसऱ्या प्रश्नाकडे वळले.

Ajit Pawar
Pathardi Farmers : दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे साकडे; केली मोठी मागणी...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा रायगडमधील कर्जत येथे निर्धार मेळावा पार पडला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. या वेळी त्यांना राऊतांचा ३१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री बदलाच्या दाव्यावर विचारण्यात आले. त्यावेळी अजित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता तडक उत्तर दिले आणि विषय संपवून टाकले.

३१ डिसेंबर रोजी राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि राऊत वारंवार बोलत आहेत. यावर अजित पवार म्हणाले, 'ते धांदात खोटे बोलतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका,' असे म्हणत त्यांनी यावर जास्त भाष्य करणे टाळले.

Ajit Pawar
Pune MNS : झोपलेली मनसे अखेर जागी झाली; अन् पुण्यात तोडफोड केली, गुन्हे दाखल...

या वेळी पवारांनी अनेक प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. खासकरून २ जुलैनंतर राष्ट्रवादीत ज्या काय घडामोडी घडल्या त्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आम्ही कुठलीही वेगळी भूमिका घेतली नाही. भाजपसोबत जाण्यासाठी पूर्वीच्या नेतृत्वाने वारंवार प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले, तर भाजपसोबत बोलणी करण्यासाठी ठरले त्यावेळी खासगी विमानातून जाण्यासाठी जयंत पाटीलही असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनिल देशमुखांना मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून त्यांनी आमच्या बरोबर आले नसल्याचा दावाही केला. पवार म्हणाले, 'अनिल देशमुखाला मंत्री व्हायचे होते. भाजपने मात्र ते शक्य नसल्याचे कळवले. देशमुखांबाबत आम्ही सभागृहात बरेच आरोप केलेले आहेत. असे असताना त्यांना लगेच मंत्रिमंडळात सहभागी करून घेणे शक्य नाही. तसे झाले तर आमच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न निर्माण होईल. भाजपने असे कळविल्यानंतर देशमुखांचे नाव कमी झाले. त्यावर मंत्रिपद नाही तर तुमच्यासोबत नाही, असे देशमुखांनी सांगितले.'

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar
NCP Political News : ठरलं तर... लोकसभेला राष्ट्रवादीतच लढाई होणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com