Ajit Pawar : चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं अजित पवारांना आव्हान, म्हणाले...

वेळप्रसंगी आठ-आठ दिवस मोबाईल बंद करून पळून जातात, अंडरग्राऊंड होतात, कधी रडतात, असे अजित पवार बघितले आहेत आम्ही.
Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule, Ajit PawarSarkarnama

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरळित पार पडेल असं वाटत असताना अचानक अधिवेशनामध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कले जात आहे. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. यावर भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
Pimpri-Chinchwad : ढाकेंना तोंड लपवावे लागणार; काटेंचा हल्लाबोल : भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "बारामतीमध्ये हुकुमशाही, मोगलशाहीसारखा कारभार सुरू आहे.माझी एंट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून काल सभागृहात त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४मध्ये जनता ठरवेल," अशी टीका बावनकुळे यांनी केली.

पुढे ते असेही म्हणाले, "खरंतर कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनता ठरवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती राहूनही कधी राष्ट्रवादी ७५च्या वर गेली नाही आणि ते काय करेक्ट कार्यक्रम करणार? बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही. मी दाव्यानं सांगतो की बारामती शहर सोडता संपूर्ण लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या वागण्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे", असं बावनकुळे यावेळी म्हणाले.

Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
Shivsena : इम्तियाज जलील खोटारडे, देसाईंकडून निधी घेतला आणि त्यांच्यावरच उलटले..

दरम्यान, "अजित पवारांच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत. अजित पवार आम्हाला माहिती आहे की वेळप्रसंगी आठ आठ दिवस मोबाईल बंद करून पळून जातात, अंडरग्राऊंड होतात, कधी रडतात, असे अजित पवार बघितले आहेत आम्ही. त्यामुळे अजित पवारांनी विदर्भात आम्हाला आव्हान देऊ नये. त्यांचं कोणतंही, कोणत्याही पातळीवरचं आव्हान स्वीकारायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे इथून पुढे नागपुरात अजित पवारांनी अशी भाषा करू नये", अशा शब्दांत बावनकुळेंनी पवारांना आव्हान दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com