Ajit Pawar|आमच्या घोषणा शिंदे गटाच्या जिव्हारी; अजित पवारांनी जखमेवर मीठ चोळलं...

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली
Ajit Pawar
Ajit Pawar
Published on
Updated on

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) दरम्यान आज अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पााहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. दोन्ही गटातील आमदारांकडून बाचाबाची झाली. घोषणाबाजी करत दोन्ही गट आक्रमक झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आमदार रोहित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीने मध्यस्थी करुन हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला.

या सर्व राड्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. "ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेत्यांनी घोषणाबाजी केली ते पाहता त्या घोषणा शिंदे गटातील आमदारांच्या जिव्हारी लागल्या आहेत. त्या घोषणा झोंबल्यामुळेच आताची परिस्थिती निर्माण झाली. आपल्या विरोधात विरोधकांना काही बोलूच द्यायचे नाही, हे या गोंधळामागचे कारण आहे. अडीच वर्षे आमची सत्ता होती तेव्हा भाजपवाले घोषणाबाजी करायचे. तेव्हा आम्ही आमची काम करायचो. आता आम्ही घोषणा देतो ते शिंदे गटाला आवडलेलं नाही आणि त्यालाच प्रत्युत्तर देण्याचा शिंदे गटाने केविलवाणा प्रयत्न केला आहे.

Ajit Pawar
विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि विरोधक आमदारांमध्ये धक्काबुक्की; पहा व्हिडीओ

अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. आम्ही विरोधी पक्षातील आमदार दररोज सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करायचो. पण त्यांना तेही पाहावलं नाही. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करायचं असतं आणि विरोधकांनी वेगवेगळ्या गोष्टींबाबत आवाज उठवण्याचंं काम करायचं असतं. हे सर्व देशातील सर्व राज्यामंध्ये चालतं, पण त्यांनी जाणीवपूर्वक त्यांना हे खटकल्यामुळे ते आक्रमक झाले. तसेच कोणत्या कारणामुळे त्यांनी राज्यातील सरकार पाडलं, ते त्यांनी सांगाव अशी विचारणाही अजित पवार यांनी केली आहे. राज्यातील जनतेनेही याबद्दल थोडा विचार करावा, असे आव्हान अजित पवार यांनी केले आहे.

तसेच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 'आम्ही हसतखेळत घोषणाबाजी करत होतो. पण शिंदे नावाच्या कोणत्या एका आमदाराने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी आईबहिणीवरुन शिव्या द्यायला सुरुवात केली. पत्रकारांनाही धक्काबुक्की केली. घोषणाबाजी करण्याचा अधिकार त्यांनाही आणि आम्हालाही. आम्ही शेतकरी प्रश्न, ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत होतो. पण खोक्यांवरुन केलेली घोषणाबाजी त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी धक्काबुक्की केली,'' असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com