Ajit Pawar Group News Mumbai :राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. याच मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवीन गाणे देखील सादर केले गेले. या गाण्यादरम्यान अजित पवार गटातील नेत्यांनी ठेका धरला. मंत्री अनिल पाटील यांच्यासह नरहरी झिरवळ यांनी ठेका धरला.
NCP मध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाचे नवीन गाणे सर्वांच्या भेटीला आले आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी हे गाणे गायले आहे. अजिंक्य लेकी... ही या गाण्याची मुख्य ओळ आहे. मुंबईत आज महिला मेळावा पार पडला.
या महिला मेळाव्यात हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या मेळाव्यात हे नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले. विशेष म्हणजे महिलांना केंद्रस्थानी ठेऊन हे गाणे लिहिण्यात आले आहे. महिलांचे समाजात असलेले योगदान, त्यांची रूपं या गाण्यात आहेत.
या गाण्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ठेका धरला. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पक्षाचा झेंडा हातात घेऊन मंचावर ठेका धरला. दुसरीकडे मंत्री अनिल पाटील यांनी गळ्यातला पक्षाचा गमछा फिरवत गाण्यावर ठेका धरला.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी देखील पक्षाच्या नव्या गाण्यानर ठेका धरला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हे नवीन गाणे आहे. बाहेर पडल्यावर आपलेही गाणे असावे, या उद्देशाने हे गाणे बनण्यात आले आहे. हे नवीन गाणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करेल, असा विश्वास नेत्यांनी दर्शवला आहे.
राष्ट्रवादीचे मूळ चिन्ह हे घड्याळ आहे. मात्र अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केली आणि या बंडानंतर राष्ट्रवादी मूळ पक्ष आमचा आहे. सर्वाधिक आमदार आमच्या सोबत आहेत, असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.
मात्र, नंतर घड्याळ तेच वेळ नवी, हे नवीन धोरण राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वीकारले. घड्याळ तेच असले तरी देखील नवी वेळ, म्हणजे ही वेळ आमची आहे. वेळ आम्ही बदलून आणली आहे, असा नारा अजित पवार गटकडून करण्यात आला आहे.
मुंबईत झालेल्या महिला मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाषणे झाली. मंत्री छगन भुजबळ यांचेही भाषण झाले. भाषणात त्यांनी एक मोठा दावाही केला आहे. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. मात्र भाजपनंतर सर्वात जास्त संख्या ही अजित पवार गटाची आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्येही हाच चमत्कार दिसून येणार आहे. भाजपनंतर महायुतीत 2 नंबरचा पक्ष हा आमचा आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. छगन भुजबळ यांनी हे विधान करून महायुतीत असलेल्या शिवसेना शिंदे गटाला डिवचल्याची चर्चा आहे.
(Edited by Sachin Fulpagare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.