Maharashtra Politics : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली, अजितदादांसोबत ३५ आमदार : नऊ आमदार मंत्री होणार..

Ajit Pawar live new : अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले आहेत.
Maharashtra Politics:
Maharashtra Politics: Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar live new : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. ५४ आमदारांपैकी ३५ आमदार अजित पवारांच्या सोबत आहे. अजितदादांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यातील राष्ट्रवादीच्या नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले आहे आहेत.

राज्यात 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात नवनवीन समीकरणे निर्माण होत आहेत. गेल्यावर्षी जूनमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर बंडाचा झेंडा फडकावला आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार खाली खेचले.

Maharashtra Politics:
Nilesh Rane slams Aaditya Thackeray : निलेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात ; आदित्य ठाकरेंच्या शाळेची फी BMC च्या..

भाजपाच्या साथीने शिवसेना-भाजपा युती सरकार स्थापन केले. त्याला वर्ष होत नाही तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra Politics:
karnataka Politics : विरोधीपक्षनेता पदासाठी या नावाची चर्चा ; अंतर्गत वादामुळे निवडीला विलंब..

काही दिवसा पूर्वी 'जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार," अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली होती. राजभवनात शपथविधीची तयारी सुरु असल्याचे वृत्त आहे. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, निलेश लंके आदी जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com