Ajit Pawar Praised PM Modi: अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक,पदवीवरुन उद्भवलेल्या वादातही घेतली बाजू

Ajit Pawar News : 2014 ला त्यांची डिग्री बघून लोकांनी पंतप्रधान मोदींना निवडून दिलं का?
Ajit Pawar  & sharad pawar
Ajit Pawar & sharad pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar on Controversy of Narendra Modi's degree : महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या शैक्षणिक पदवीवरुन हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी अनेकजण पदव्या दाखवतात पण किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांना पदवी दाखवा म्हणून विचारणा केली तर 25 हजारांचा दंड बसतो अशी टीका केली होती.

यानंतर संजय राऊतांनीही मोदींच्या पदवीवरुन टोला लगावला होता. मात्र, आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदवीवरुन टीका करणाऱ्यांना परखड बोल सुनावले आहेत.

Ajit Pawar  & sharad pawar
Thackeray-Shinde Politics: सुषमा अंधारे आक्रमक: शिरसाटांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल, काय आहे प्रकरण?

अजित पवार(Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरेंच्या विशेष खुर्चीपासून ते पंतप्रधानांच्या डिग्रीपर्यंतच्या विविध घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या डि-लीट पदवीवरून टीका झालेली आहेत. यावरून राजकारण सुरू झालेले आहे. पवार यांनी यावेळी मोदींच्या पदवीवर टीका करणाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी मोदींचं कौतुक तर केलेच शिवाय पदवीसंदर्भातील वादात त्यांची बाजूही घेतली.

पवार म्हणाले, 2014 ला त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिलं का? 2014 ला पंतप्रधान मोदींनी त्यांचा स्वतःचा असा करिष्मा दाखविला. तसेच जो भाजपाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्वस्व श्रेय नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे. लोकशाहीत बहुमताच्या आकड्याला,आदराला महत्व आहे. देशात ५४३ खासदार ज्यांच्याकडे आहेत, तो पंतप्रधान होतो. तर, राज्यात १४५ चं बहुमत असेल तर तो मुख्यमंत्री होतो असं पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar  & sharad pawar
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंच्या दिमतीला नवीन 'थापा'; महिन्यापासून सावलीसारखा ठाकरेंच्या पाठीशी...

तसेच जो भाजपाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्वस्व श्रेय नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे. लोकशाहीत बहुमताचा आदराला महत्व आहे. देशात ५४३ खासदार ज्यांच्याकडे आहेत, तो पंतप्रधान होतो. तर, राज्यात १४५ चं बहुमत असेल तर तो मुख्यमंत्री होतो असं विरोधी पक्षनेते पवार यांनी सांगितलं आहे.

पण आज याच्या डिग्र्या, त्याच्या डिग्र्या काढणं हा प्रश्न महत्त्वाचा आहे का? यापेक्षा गॅस सिलिंडर, महागाई, बेरोजगारी त्याबद्दल बोलायचं नाही कुणी चर्चा करायची नाही असा हल्लाबोल पवार यांनी केला आहे.

Ajit Pawar  & sharad pawar
Rahul Gandhi-BJP Politics: जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींचे पहिले ट्विट; हा लढा...

...ती पदवी नवीन संसद भवनाच्या मुख्य गेटवर लावावी!

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीवरुन निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी आपले पंतप्रधान मोदीजींची पदवी बोगस असल्याचं लोक म्हणतात, पण ‘Entire Political Science’ या संशोधन विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पदवी आहे असं माझं मत आहे. ती फ्रेम करून नवीन संसद भवनाच्या मुख्य गेटवर टांगली जावी. जेणेकरून लोक पंतप्रधानांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत असा टोला राऊतांनी लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com