साखर कारखाने विक्रीवरून फडणवीस-अजित दादांत रंगला सामना

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राज्यातील साखर कारखाने विक्रीच्या आरोपांबाबत मोठा खुलासा केला आहे.
Ajit Pawar, Maharashtra Assembly Session 2022 News, Devendra Fadnavis vs Ajit Pawar
Ajit Pawar, Maharashtra Assembly Session 2022 News, Devendra Fadnavis vs Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई - राज्याचे विधीमंडळ अधिवेशन मुंबईत सुरू आहे. यात भाजपकडून साखर कारखाने खरेदी-विक्रीतील घोटाळ्या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी केलेल्या तक्रारीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी उत्तर देताना या साखर कारखाने विक्रीच्या आरोपांबाबत मोठा खुलासा केला आहे. ( Ajit Pawar on the charge of buying and selling transactions in the co-operative sugar factory said ... )

प्रश्नोत्तराच्या तासात सहकारी साखर कारखाने खरेदी-विक्रीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार योगेश सागर व आशिष शेलार यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सारवा सारव करणारी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांवर सरकारला जाब विचारत हक्कभंग लागू करण्याचीही देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देण्यासाठी उभे राहिले.(Maharashtra Assembly Session 2022 News)

Ajit Pawar, Maharashtra Assembly Session 2022 News, Devendra Fadnavis vs Ajit Pawar
अण्णा हजारे म्हणाले, भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले

भाजपच्या या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सहकारी साखर कारखाने खरेदी-विक्री व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याबाबत राज्यात अनेकवर्षे चर्च सुरू आहे. मला सांगायचं कारण नसताना वेगळ्या पद्धतीने गैरसमज निर्माण होतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा माजी खासदार राजू शेट्टी यांनी अशी तक्रार केली होती. अण्णा हजारे यांनी तुमच्याकडे व राज्यपालांकडे तक्रार केली होती. तुम्ही सीआयडी चौकशी लावली. ही चौकशी तुमच्या मुख्यमंत्री काळात झाली. या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही.

अजित पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ही पोलिसांच्या आर्थिक अपराध शाखेला चौकशीचे आदेश दिले. न्यायाधीशांकडून चौकशी केली. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळातच दोन चौकश्या झाल्या. मात्र काहीही निष्पन्न झाले नाही.

Ajit Pawar, Maharashtra Assembly Session 2022 News, Devendra Fadnavis vs Ajit Pawar
अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यायला नको होते...

अनेक साखर कारखाने राज्य सहकारी बँकेला द्यायचे लोक आरोप करतात मग कारखाने चालवायला घ्या. साखर कारखाना खरेदी-विक्री बाबत फडणवीस यांच्यासह देशपातळीवर गैरसमज झालेला आहे. प्रत्येकाला साखर कारखाना चालवायचा अनुभव आहे. साताऱ्यात किसनवीर साखर कारखान्यावर 625 कोटीचे कर्ज झाले. आता कारखान्यापेक्षा कर्जच जास्त झालं. समस्या कुणाला माहीत नाही. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात.

उच्च न्यायालयाने आदेश दिला हे साखर कारखाने पैसे देऊ शकत नाही. कारखाने विका. त्यानुसार ही विक्री प्रक्रिया राबविला. अण्णा हजारे यांनी मागे तक्रार केली होती. एकदा त्यांना जाऊन भेटाव आणि कोणाच्या चौकश्या झाल्या. सीआयडी, एसीपी, ईओडब्ल्यू, न्यायाधिशांकडून चौकश्या झाल्या. त्यात काय झाले हे त्यांना सांगावं. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, असा टोलाही अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

Ajit Pawar, Maharashtra Assembly Session 2022 News, Devendra Fadnavis vs Ajit Pawar
Video: "सर्व घटकांतील कामांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही केला"; अजित पवार

या राज्यात यशवंतराव मुख्यमंत्री आल्यापासून देवेंद्र फडणवीस असे पर्यंत साखर कारखान्यांना सरास हमी देण्यात आली. उद्धव ठाकरे सरकार आल्यावर पंढरपूर कारखाना, शंकरराव काळे, धनंजय महाडिक कारखाने, संग्राम थोपटे अश्या पाच कारखान्यांना हमी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले साखर कारखान्यांना राज्य सरकार हमी देणार नाही. अडीच वर्षे झाली जो तो आपला कारखाने चालवत आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com