Ajit Pawar News, Raj Thackeray News, Ajit Pawar on Raj Thackeray
Ajit Pawar News, Raj Thackeray News, Ajit Pawar on Raj Thackeray sarkarnama

राज ठाकरेंना जास्त महत्व देऊ नका ; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

राज ठाकरे यांनी कालच्या सभेत अजित पवार यांच्यावर टीका केली होती, त्याला पवारांनी उत्तर दिलं.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी काल (12 एप्रिल) ठाण्यात उत्तरसभा घेतली. या सभेत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

''राज्याच वातावरण गढूळ करण्याचे काम सुरु आहे. आता भोंगे बंद करा म्हणण्याचे कारण काय,'' असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar)यांनी बीड जिल्ह्यात केला होता. त्यावर कालच्या सभेत राज ठाकरेंनी त्यांना उत्तर दिले होते. (Ajit Pawar on Raj Thackeray)

''भोंगे बंद करा, असे मी पहिल्यांदा म्हटलं नाही, यापूर्वीही मी असे तीन वेळा म्हटलं आहे, पण अजित पवारांना ते ऐकू आले नाही, पहाटेच्या शपथविधीनंतर त्यांना काही दिवस ऐकू येत नव्हते, शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांच्या कानाखाली जो आवाज काढला त्यानंतर त्यांना दोन महिने ऐकू येत नव्हते. त्यामुळे त्यांनी माझे यापूर्वीचे मी तीन वेळा 'भोंगे काढा' हे मत ऐकू आले नसावे,'' असे राज ठाकरे यांनी काल सभेत सांगितले.

Ajit Pawar News, Raj Thackeray News, Ajit Pawar on Raj Thackeray
राऊतांना लवंडे म्हणणाऱ्या राज ठाकरेंना एका वाक्यात प्रत्युत्तर!

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांना मुंबईच्या ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी अजित पवार आज सकाळी ब्रीच कॅंडी मध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंनी केलेल्या टीकेबाबत अजित पवार यांना विचारले. अजित पवार म्हणाले, ''अशा लोकांना जास्त महत्व देऊ नका, मी सध्या धनंजय मुंडे यांना भेटायला आलोय. वेळ आल्यावर मी याबाबत उत्तर देईन, राज्यात इतरही महत्वाचे विषय आहेत,''

Ajit Pawar News, Raj Thackeray News, Ajit Pawar on Raj Thackeray
मंत्रीपद मिळालयं तर नीट काम करा ; यशोमती ठाकूर यांना पेडणेकरांचा सल्ला

''धनजंय मुंडे यांची प्रकृती ठिक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. मुंडेंना सध्या आराम करण्यास सांगितला आहे. त्यामुळे नागरिकांनी मुंडेना भेटायला येऊ नये, तिथूनच शुभेच्छा द्याव्यात. मुंडे यांना ह्दयविकाराच्या झटका आल्याची अफवा पसरवली आहे, पण त्यांना ह्दयविकाराच्या झटका आलेला नाही,'' असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे यांनी या कालच्या सभेत तुफान फटकेबाजी करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्नधान्यपुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आदींवर राज ठाकरेंनी टीका केली. कालच्या भाषणात राज ठाकरेंच्या रडारवर महाविकास आघाडी सरकारच होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com