Ajit Pawar Sit On CM Chair : ...अन् विधानसभा अध्यक्षांनीच अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवले

Rahul Narwekar And Ajit Pawar : आमदार निवास्थानाच्या इमारती भूमिपूजन कार्यक्रमातील किश्याने चर्चा
Ajit Pawar, Rahul Narwekar
Ajit Pawar, Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : 'अजित पवार-मुख्यमंत्री पद अन् चर्चा' हे महाराष्ट्राला काही नवीन राहिलेले नाही. मात्र मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजितदादांनींही काही लपवून ठेवलेली नाही. वारंवार स्पष्टीकरण देऊनही त्यांच्याबाबत असे काहीतरी घडते की अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा कायमच राज्यात होत आलेली आहे. आता तर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारच मुख्यमंत्र्यांसाठी ठेवलेल्या खुर्चीवर बसल्याचे गुरुवारी समोर आले. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अजितदादांना ती खुर्ची मोकळी करून दिली. यामुळे चर्चा झाली नाही तर नवलंच म्हणावे लागेल! (Latest Political News)

Ajit Pawar, Rahul Narwekar
Nitin Desai To Eknath Shinde : नितीन देसाईंची 'ऑडिओ क्लिप' आली समोर; राज्य सरकारला केले 'हे' आवाहन

मुंबईत 'मनोरा' या फाईव्ह स्टार आमदार निवासाच्या प्रत्यक्ष बांधकामाचे भूमिपूजन गुरुवारी (ता.३) सकाळी झाले. यावेळी मुख्यमंत्री एकानाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रत्येकासाठी खुर्ची ठेवली होती. मात्र यावेळी मुख्यमंत्री शिंदे आले नाहीत. कार्यक्रमाला आधी आलेले मान्यवर आपापल्या खुर्च्यांवर विराजमान झाले होते. यानंतर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नार्वेकरांशेजारी ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे गेले. या खुर्चीवर लावलेला मुख्यमंत्र्यांचा स्टिकर नार्वेकरांनी स्वतः काढला आणि खुर्ची अजितदादांसाठी मोकळी करून दिली.

विधानसभा अध्यक्ष असलेल्या नार्वेकरांनीच मुख्यमंत्री असलेला स्टिकर काढून ती खुर्ची अजित पवारांसाठी उपलब्ध करून दिल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे संजय राऊतांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करून राज्यात खळबळ उडवून दिलेली आहे. तसेच मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजित पवारांनीही बोलून दाखवलेली आहे. यानंतर आज ते थेट मुख्यमंत्र्यांच्या खर्चीवर जाऊन बसले. यासाठी त्यांना नार्वेकरांनी मदत केल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

या प्रकारावर ठाकरे गटाचे नेते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनीही मिश्किल टिपण्णी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. दानवे म्हणाले, "कुणाला मुख्यमंत्री करायचे आणि कुणाला नाही हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्याच हातात आहे. त्यानुसार त्यांनी कृती केली असेल." यानंतर राहुल नार्वेकरांनीही झालेल्या प्रकारावर स्पष्टीकरण देताना म्हटले, मुख्यमंत्री शिंदे कार्यक्रमाला येणार होते. मात्र, काही वैयक्तिक काम आल्याने ते येऊ शकले नाहीत. कोणाचीही नाराजी नाहीये एवढा चांगला कार्यक्रम होत असताना निरर्थक चर्चा नको."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com