Ajit Pawar: ''...म्हणून अजित पवारांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, त्यांना पाकिस्तानात पाठवा!''

Bjp's Former Mla Narendra Pawar on Ajit Pawar Statement : छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातील नेत्याला माहीत नाही हे दुर्देव...
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Bjp's Former Mla Narendra Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवट्या टप्प्यांत छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते असं विधान केलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. भाजप व शिंदे गटाने देखील अजित पवारांच्या संभाजीराजेंविषयी केलेल्या विधानाविरोधात रान पेटवायला सुरुवात केली आहे.

पण आता भाजपच्या माजी आमदारानं एक खळबळजनक मागणी केली आहे. त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) भारतात राहण्याचा नेतिक अधिकार नसून त्यांची रवानगी पाकिस्तानात करा अशी मागणी केली आहे.

Ajit Pawar
West Bengal: भष्ट्राचारी नेत्यांचे दाबे दणाणले ; TMC चा मोठा निर्णय

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे.

नरेंद्र पवार म्हणाले, महाराष्ट्रातील नेते अजित पवार हे संभाजी महाराजांना धर्मवीर मानायला तयार नाहीत.ज्यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज माहीत नाही. तसेच ज्यांना संभाजी महाराज धर्मवीर होते हे माहीत नाही त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.त्यामुळे खरंच अजित पवारांची रवानगी पाकिस्तानात केली पाहिजे अशी मागणी केली आहे.

Ajit Pawar
BJP Mission 144 : जे.पी नड्डा आज चंद्रपूर दौऱ्यावर येणार: काय आहे कारण?

अजित पवारांनी जे विधान केलं, त्याबद्दल खरंतर त्यांना हिंदुस्थानातून हाकलून द्यायला हवं. पाकिस्तानमध्ये त्यांची रवानगी केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नेत्याला माहीत नाही ते महाराष्ट्राचं दुर्देव आहे, अशी टीका नरेंद्र पवार यांनी केली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी मंत्रिमंडळात असताना, निर्णय घेताना सगळ्यांना सांगायचो की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आपण करावा असे अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com