Mushrif On Amol Kolhe: अजितदादांनंतर आता मुश्रीफांचा कोल्हेंबाबत मोठा खुलासा; म्हणाले, 'खासदारकीचा...'

Hasan Mushrif : अमोल कोल्हे यांच्या निवडणूक लढवण्याबाबत..., हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
Ajit Pawar Dr.Amol Kolhe
Ajit Pawar Dr.Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंना थेट चॅलेज देत शिरुर लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवार निवडून आणून दाखवणारच, असं थेट आव्हान दिलं. तसेच अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला. यावर अमोल कोल्हेंनीही प्रतिक्रिया देत 'बात निकली हे तो दूर तक जाएगी...', असा सूचक इशारा दिला. यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफांनी अमोल कोल्हेंबाबत मोठा खुलासा केला आहे.

"खासदार अमोल कोल्हेंनी मला अनेकदा सांगितलं होतं की, मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही. माझ्यावर शरद पवार आणि राष्ट्रवादीचा शिक्का बसला. खासदारकीचा परिणाम माझ्या कामावर होत आहे, असं त्यांनी अनेकदा खासगीत सांगितलं होतं", असा मोठा खुलासा मंत्री मुश्रीफांनी केला. ते गुरुवारी माध्यमांशी बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar Dr.Amol Kolhe
NCP Politics: अजित पवारांनी दिला भुजबळांच्या भात्यात आणखी एक बाण !

अजित पवारांनी कोल्हेंवर जोरदार टीका करत थेट आव्हान दिले होते. तसेच अजित पवारांनी कोल्हेंना इशारा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात भेट देत तेथील विकास कामांची पाहणी केली होती.

ही पाहणी करतानाच कोल्हेंना पुन्हा इशारा देत 'मी सांगितलं तेच फायनल, विषय संपला', असं चॅलेज दिलं. अजित पवारांनी कोल्हेंवर केलेल्या या आव्हानावर आता हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) प्रतिक्रिया देत "अजितदाद नाराज झालेले असावेत, त्यामुळेच ते तसं म्हणाले असावेत", अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली.

दरम्यान, अजित पवारांच्या (Ajit Pawar) टीकेनंतर खासदार कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता हसन मुश्रीफांनीही त्यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे हसन मुश्रीफांना कोल्हे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

अजित पवारांच्या टीकेनंतर कोल्हे काय म्हणाले होते ?

"खासगीत जी चर्चा होते, ती चर्चा सार्वजनिक करायची नसते. हा एक संकेत आहे", असं कोल्हे म्हणाले होते. तर खासदारकीचा राजीनामा द्यायला गेले होते, अजित पवारांच्या टीकेवर बोलताना 'बात निकली हे तो दूर तक जाएगी...', अशी सूचक प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली होती.

(Edited By Ganesh Thombare)

Ajit Pawar Dr.Amol Kolhe
Ajit Pawar Vs Amol Kolhe : 'मी काल सांगितलं तेच फायनल, विषय संपला'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com