Maharashtra Politics : अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी आणि मनसेतला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. अमोल मिटकरी यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी मिटकरींवर पलटवार केला आहे.
"मनसेचे पदाधिकारी जय मालोकार याच्या मृत्यूला दहा दिवसही झाले नाही.. आणि त्याच्या मृत्युचं राजकारण मिटकरी करीत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे," असेही साबळे यांनी म्हटलं आहे. "जय मालोकार हा चांगला मुलगा होता, असे मिटकरी म्हणतात, मग पोलिस तक्रारीमध्ये त्याचे नाव कुणी टाकले," असा सवाल साबळे याने उपस्थित केला आहे.
साबळे यांनी मिटकरी यांची तुलना राखी सावंत यांच्याशी केली आहे. मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत असल्याचे साबळे यांनी म्हटलं आहे. आमच्या नेत्याला पळकुटा म्हणतोय...बाथरूममध्ये कोण लपले होते? हे सगळ्यांना माहिती आहे, असे साबळे यांनी मिटकरींना सुनावले.
“मनसे पक्ष पळपुट्यांचा, सोंगाड्यांचा आहे. नागपुरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या विकृत कृत्याच प्रकरण समोर आलय, लवकरच तुम्हाला ते समजेल” असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. ‘शेवटी मनसे हा सुपारीबाज, गुंडशाही, झुंडशाही आणि बेवडेशाही असलेल्यांचा पक्ष आहे’ अशी टीका मिटकरींनी केली.
शरद पवार कोर्टात केस जिंकले, तर अजितदादांना कटोरा घेऊन फिरावं लागेल असं योगेश चिले म्हणालेत, त्यावर मिटकरी म्हणाले की, “चिले, पिले, ही बांडगुळ नवीनच ऐकतोय. त्यांची औकात काय? देशपांड्या, चिल्या, खोपकर यांची औकात काय? घरात बायको इज्जत देत नाय आणि हे अजित पवारांवर भुंकायला लागलेत”
अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात आणखी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजी नगरसेवक राजेश काळे आणि सचिन गव्हाळे या दोघांना सिव्हील लाईन पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत आतापर्यंत 11 जणांना ताब्यात घेतले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.