एसटी बसेस बुक करण्यासाठी नऊ कोटी कोणी भरले?

शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळावा 1795 बसेस राज्यातून बुक केल्या, असा आरोप अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला.
Ambadas Danve
Ambadas Danve Sarkarnama

Ambadas Danve : मुंबई : शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळावा 1795 बसेस राज्यातून बुक केल्या. 1795 बसेस आरक्षित केल्यानंतर 9 कोटी 99 लाख 40 हजार 500 रुपये रोख स्वरूपात आगार व्यवस्थापक मुंबई यांच्याकडे 3 ऑक्टोबरला भरले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), यांनी केला.

1795 बसेस पैकी 1625 बसेसचा वापर झाला. हे पैसे कोणी भरले याची विचारपूस एसटीला केली का? यातील ज्या 170 बसेस रद्द झाल्या त्याचा परतावा कोणाला देणार, असा सवाल त्यांनी केला. आता काही बसेस त्या आगारात नाहीत. ज्यात पॅसेंजर नाही तर त्याला व्यर्थ किलोमीटर हा शब्द एसटीच्या परिभाषेत आहे. सदर व्यर्थ झालेल्या किलोमीटरची रक्कम आहे कोण देणार?

Ambadas Danve
थोरातांना राष्ट्रवादीने तिकिट दिले की पराभूत करता अन्‌ अपक्ष निवडून देताय : पवार दौंडमधील पराभव विसरेनात

कायद्यांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात झाले आहे. शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांच्याकडे 11 लाख रक्कम मिळाली. त्याची ईडी चौकशी झाली होती. आता एवढी मोठी रक्कम भरली तो समोर आला पाहिजे ही रक्कम कोणी भरली. त्याचा तेवढा इंनकम सोर्स आहे का? याची माहिती मी मागवली आहे, असेही दानवे म्हणाले.

Ambadas Danve
Aurangabad : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील चक्क शिवसेना कार्यालयात...

दिवाळीत जनतेला १०० रुपयात धान्य मिळणार आहे. त्यावरुनही दानवे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. 1 तारखेला याचे टेण्डर काढले. एवढी घाई का झाली? तीन दिवसात टेंडर का काढले, असा सवाल त्यांनी केला. खुल्या बाजारात 280 रुपये यासाठी लागतात. तीन दिवसासाठी टेंडर का काढले यात खुली स्पर्धा व्हायला हवी होती. डीबीटीची पद्धत आहे, असेही ते म्हणाले. जनतेला जर द्यायचे तर तुम्ही मोफत द्या, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com