Aurangabad : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील चक्क शिवसेना कार्यालयात...

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करून इम्तियाज जलील हे निवडून आले आहेत. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी देखील लागला होता. (Mp Imtiaz jalil)
Mp Imtiaz Jalil In Shivsena Office News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil In Shivsena Office News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील एमआयएचे आहेत, पण वाटतात भाजपचेच असा चिमटा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकताच काढला होता. त्यावर भाजपमध्ये जाण्याचे पाप, गुन्हा मी आयुष्यात करणार नाही, असा पलटवार करणारे इम्तियाज जलील आज चक्क (Shivsena) शिवसेनेच्या कार्यालयात दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राजकीय नेते एकाच व्यासपीठावर अनेकदा दिसतात पण एकमेकांच्या पक्ष कार्यालयात ते सहसा कधी जात नाहीत. अशी उदाहरणे फार कमी पहायला मिळतात. (Aurangabad) एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) मात्र याला अपवाद ठरले आहेत. मतदारसंघातील वैजापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी शिऊर गावच्या शिवसेना कार्यालयाला भेट दिली आणि तिथे शिवसैनिकांनी त्यांच्या सत्कार देखील केला.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करून इम्तियाज जलील हे निवडून आले आहेत. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी देखील लागला होता. तीन वर्षांपुर्वीच्या या जखमा अजूनही ताज्या असतांना इम्तियाज जलील यांचा थेट शिवसेना कार्यालयातच सत्कार झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र याकडे सकारात्मक दृष्टीने देखील बघितले जात आहे.

राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू आणि मित्र नसतो असे नेहमीच म्हटले जाते. जिल्ह्याचा खासदार संपर्क मोहिम दौऱ्यानिमित्त आपल्या गावात आला म्हटल्यावर शिवसैनिकांनी त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचा सत्कार देखील केला. राजकारणापलीकडच्या या कृतीने एक नवा पायंडा देखील पडू शकतो.

Mp Imtiaz Jalil In Shivsena Office News, Aurangabad
MNS : अमित ठाकरेंचा आजपासून दहा दिवस मराठवाड्यात मुक्काम

नुकताच औरंगाबाद रेल्वेस्थानकात केंद्रीय रेल्वे मंत्री व जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत पीटलाइन आणि रेल्वेस्थानक नुतनीकरण कामाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्या भाषणानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषण केले.

यात त्यांनी इम्तियाज जलील हे एमआयएमचे खासदार असले तरी ते भाजपचेच वाटतात, असा टोला लगावला होता. आता तर इम्तियाज जलील थेट शिवसेनेच्या कार्यालयातच जाऊन आले. त्यावर शिवसेनेकडून अद्याप तरी काही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु या भेटीची चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com