NCP खासदाराकडून BJP खासदाराला चिमटा ; Tweet व्हायरल ; ‘तेजस्वी सूर्य’ असल्याने फोटो चांगला..

Amol Kolhe mock Tejasvi Surya : हे विमान चेन्नईवरुन त्रिवेंद्रमला जात होते.
Amol Kolhe mock Tejasvi Surya
Amol Kolhe mock Tejasvi Suryasarkarnama

Tejasvi Surya : काही दिवसापूर्वी भाजपच्या युवा खासदाराने अचानक विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडला होता. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली तसेच प्रवाशांना तब्बल २ तास ताटकळत बसावे लागले. याच घटनेचा संदर्भ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा खासदार अमोल कोल्हे यांनी खिल्ली उडवली आहे. काळे यांनी केलेल्या टि्वटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

डिसेंबर महिन्यात भाजपचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडल्याने हा प्रकार घडला होता. इंडिगो एअरलाईन्सने हा प्रकार लपवून ठेवला होता. मात्र, एका सहप्रवाशामुळे ही घटना उघडकीस आली. हे जर कुण्या सामान्य प्रवाशाने केले असते तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली असती. पण भाजप खासदार असल्याने कुठलीच कारवाई करण्यात आली नाही, आरोप आता करण्यात येत आहे. तेजस्वी सूर्या हे इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करत होते. हे विमान चेन्नईवरुन त्रिवेंद्रमला जात होते.

Amol Kolhe mock Tejasvi Surya
Solapur News : सोलापूर मतदारसंघ कुणाचा ? ; दोन्ही काँग्रेसच्या भांडणात आता नवी एन्ट्री

तेजस्वी सूर्या हे विमानातील एक्झिट डोरच्या बाजूच्या आसनावर बसले होते. त्यानंतर विमान सुटायला अवघी काही मिनिटं शिल्लक असताना तेजस्वी सूर्या यांनी यांनी अचानक इमर्जन्सी एक्झिटचा दरवाजा उघडला होता. त्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. त्यावरून अमोल कोल्हेंनी हे ट्वीट करत तेजस्वी सूर्या यांची खिल्ली उडवली आहे.

"बसल्या बसल्या वाटून गेलं… विमानात खासदार इमर्जन्सी एक्झिटजवळ बसले की विमान कर्मचाऱ्यांना टेन्शन येत असेल का? LOL.टीप – मागे जरा ‘तेजस्वी सूर्य’असल्याने फोटो चांगला आला नाही," असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

१० डिसेंबर रोजी तेजस्वी सूर्या हे इंडिगो विमानाने चेन्नईवरुन त्रिवेंद्रमला जात होते. यावेळी ते इंडिगोच्या विमानात बसले होते. थोड्याच वेळात विमान हे उड्डाण घेणार होते. यावेळी त्यांनी अचानक विमानाचा इमर्जन्सी एक्झिटचा दरवाजा उघडला. दरम्यान, विमानात हवा येत असल्याची बाब विमानातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने सगळ्या प्रवाशांना खाली उतरवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com