Amol Mitkari : राज्यपालांचा एकेरी उल्लेख करत मिटकरींची भाजपवर बोचरी टीका ; म्हणाले,कोश्यारी तुमचा...?

Amol Mitkari On Bjp: राज्यात आणि केंद्रात औरंगजेब विचारांचं तुघलकी सरकार...
Amol Mitkari, Bjp
Amol Mitkari, Bjp Sarkarnama

Amol Mitkari Vs Bjp : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजपच्या नेतेंमंडळींकडून अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न सुरु असतानाच राष्ट्रवादीचे अनेक नेते अजितदादांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी देखील राज्यपालांचा एकेरी उल्लेख करत भाजपवर बोचरी टीका केली आहे.

अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.मिटकरी म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, त्यावेळी भाजपाचा एकही नेता, व्यक्ती रस्त्यावर आंदोलन करताना दिसला नाही.

Amol Mitkari, Bjp
Amol Mitkari : मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावताच मिटकरींनी व्यक्त केली दिलगिरी; सभागृहात नेमकं काय घडलं?

पण अजित पवार छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते असं बोलले तर एकसुरात भाजपाचे लोक पेटायला लागली. अरे इतकं पेटायचं काय कारण आहे? भगतसिंग कोश्यारी तुमचा जावई लागतो का? असा बोचरा सवाल विचारतानाच राज्यात आणि केंद्रात तुघलकी सरकार असून ते औरंगजेब विचारांचं आहे अशी खरमरीत टीका देखील अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली.

भगतसिंग कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील यांनी ज्यावेळी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्यं केली, त्यावेळी भाजपवाले गप्प का बसले होते. पण आता हीच मंडळी अजित पवारांविरोधात रस्त्यावर उतरत आहे. मात्र,चंद्रशेखर बावनकुळे यांना माझं खुलं आव्हान आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांना किती भाषा येत होत्या याचं उत्तर द्यावं आणि त्या भाषांची नावंसुध्दा त्यांनी जाहीरपणे सांगावी.

Amol Mitkari, Bjp
Priyanka Gandhi : ''अदानी,अंबानींनी सर्वांना विकत घेतलं, पण राहुल गांधींना ते विकत घेऊ शकले नाही;कारण..!''

धर्मवीर की स्वराज्यरक्षक वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पवार म्हणाले, संभाजी महाराजांना काही लोक धर्मवीर म्हणत असतील तर त्यात काहीच वावगं नाही. महाराजांना धर्मवीर असं बोलणं काही चुकीचं नाही. संभाजी महाराज हा आस्थेचा विषय आहे, त्या भावनेतून कोणी धर्मवीर म्हणा की, स्वराज्यरक्षक म्हणा आपल्याला काहीच अडचण नाही, असे पवार यांनी भूमिका स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अजित पवार स्वत: माध्यमांसमोर येऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील असेही पवारांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com