Amol Mitkari On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी खुमखुमी काढल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले...

Ajit Pawar NCP : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे मंत्री, आमदारांची आज बैठक होती. मात्र मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नेत्यांना त्याचा फटका बसला.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत तू-तू-मे-मे सुरू झाले. महायुतील घटक पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत काहीही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीच्या मेळाव्यात प्रवक्त्यांचा समाचार घेतला. फडणीवसांनी तर तिखट भाषेत संबंधित वाचाळवीरांना सुनावले. त्यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार Ajit Pawar गटाचे मंत्री, आमदारांची आज बैठक होती. मात्र मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नेत्यांना त्याचा फटका बसला. अमोल मिटकरींनाही वेळेवर पोचता आले नाही. दरम्यान, त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचनेवर भाष्य केले.

लोकसभा निवडणुकीवर कोणतेही भाष्य न करण्याची सूचना राष्ट्रवादीकडून मिळाली असल्याचे मिटकरींनी स्पष्ट केले. त्यानंतर षणमुखानंद सभागृहात वरिष्ठांनी प्रवक्त्यांना दिलेल्या इशाऱ्यावर मिटकरी Amol Mitkari म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही झालेल्या प्रकाराचे सुतोवाच केले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वरिष्ठ आहेत. त्यांच्या आज्ञेचे पालन राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्त म्हणून मी नक्की करेन. पण मी जसा प्रोटोकॉल पाळतो तसाच शिवसेना आणि भाजपच्याही प्रवक्त्यांनी प्रोटोकॉल पाळावा, अशी अपेक्षाही मिटकरींनी व्यक्त केली

Amol Mitkari
Nilesh Lanke : पराभवाचा झटका दिलेले नीलेश लंके अडून बसले अन् मनधरणीसाठी राधाकृष्ण विखेंना यावच लागलं...

फडणवीस काय म्हणाले?

महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीसांनी तिनही पक्षांच्या वाचळवीर नेत्यांचे कान टोचले. यावेळी फडणवीसांनी Devendra Fadnavis लोकसभा निवडणुकीत विसंवाद असल्याची कबुलीही दिली होती. ते म्हणाले, महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते, प्रवक्त्यांना सांगतो, की आपल्या एकमेकांमध्ये विसंवाद आहे. प्रवक्ते काय बोलतायत ते बघा. त्यातूनही बोलायची खुमखुमी असेल तर आपल्या नेत्यांना विचारा आणि खुमखुमी पूर्ण करा, अशा शब्दांत फडणवीसांनी महायुतीतील प्रवक्यांना ठणकावले.

(Edited by Sunil Dhumal)

Amol Mitkari
Pune Metro : पुणेकरांना केंद्राने दिलं दिवाळी गिफ्ट!; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत आली मोठी अपडेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com