दलितांवर पुन्हा सत्याग्रह करण्याची वेळ सरकारनं आणली ; भाजपचा आरोप

जीवघेण्या थंडीत आमच्या आई बहिणी गावच्या वेशीवर ठिय्या बसल्या होत्या. अनेकांनी गाव सोडून दिलंय. हा फक्त पाण्याचा पुरता विषय नाही. हा सरळ सरळ तुम्ही सामाजिक बहिष्कार घालत आहात.
Uddhav Thackeray, Ram Satpute
Uddhav Thackeray, Ram Satputesarkarnama
Published on
Updated on

अमरावतीः चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर या गावात महिनाभरापासून ग्रामपंचायतने पाणी पुरवठा केला नाही. त्यामुळे येथील महिलांनी थेट गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोनदिवसापासून काही नागरिकांनी गावापासून दोन किलोमीटर वर जाऊन ठिय्या मांडला आहे. यावरुन भाजपचे नेते, आमदार आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

''फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं मत मागून, इथल्या वंचित शोषित घटकांच्या भावनांचा खेळ करत सत्ता उपभोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आज दलितांवर पाण्यासाठी पुन्हा सत्याग्रह करण्याची वेळ आणलीये, असा आरोप राम सातपुते (Ram Satpute)यांनी केला आहे.

''अमरावतीच्या सावंगी मग्रापुर गावातल्या दलित बहूल वॉर्डात महिनाभरापासून पाणी नाही. गावातील सरपंचांनी हेतूपूरस्पर पाण्याचे कनेक्शन तोडले आहेत. जीवघेण्या थंडीत आमच्या आई बहिणी गावच्या वेशीवर ठिय्या बसल्या होत्या. अनेकांनी गाव सोडून दिलंय. हा फक्त पाण्याचा पुरता विषय नाही. हा सरळ सरळ तुम्ही सामाजिक बहिष्कार घालत आहात. हा मोठा गुन्हा आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेनी या प्रकरणाची दखल घेत समिती स्थापन करून तातडीने चौकशीचे आदेश दिले पाहिजेत,'' असे सातपुते म्हणाले.

Uddhav Thackeray, Ram Satpute
मोदींनी दिले निर्यात वाढविण्याचे राजदूतांना टार्गेट

''वंचित घटकाच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी संस्थाही लाभ देण्यासाठी सावकारसारखं वागते, बील काढण्यासाठी तुम्हाला पार्ट्या द्यावा लागतात. या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा. धनंजय मुंडे हा भोंगळ प्रकार कुणाच्या आर्शीर्वादानं सुरू आहे,'' असा सवाल सातपुते यांनी उपस्थित केला आहे.

सातपुते म्हणाले, ''आघाडीची सत्ता आली की दलित,वंचित, शोषित घटकावर अत्त्याचार वाढतात.ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. आता लवकरात लवकर संबंधित सरपंच, उपसरपंचावर कारवाई झाली पाहिजे,''

Uddhav Thackeray, Ram Satpute
राजकीय नेत्यांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बंडातात्या कराडकरांवर गुन्हा दाखल

सावंगी मग्रापूर येथील वार्ड क्र.१ मध्ये ९० टक्के दलित बांधव राहत असुन बोटावर मोजता येईल ऐवढ्यांकडे नळ आहेत. या वार्डातील नागरिकांनी नळ कनेक्शन मिळण्याकरीता सतत मागणी केलेली आहे. मात्र सावंगी म्रग्रापूर सरपंच व उपसरपंच यांनी हेतु पुरस्पर आणि द्वेष भावनेने एका महिन्यापासून वार्ड क्र.१ चा संपूर्ण पाणीपुरवठा बंद केला आहे. याबाबत विचारणा करण्यास गेल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात आल्याची माहिती नागरिकांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com