Maharashtra Politics: काँग्रेस फुटणार; सर्वपक्षीयांचे सरकार येणार ? नारायण राणेंचा नवा बॉम्ब

Narayan Rane News: काँग्रेस फुटीचे भाकीत मांडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सर्वपक्षीय सरकार उभारण्याचे संकेत दिले.
NCP, BJP, Shivsena , Congress
NCP, BJP, Shivsena , CongressSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: ठाकरेंची शिवसेना फुटली, ५० आमदार पळाले, पवारांच्या राष्ट्रवादीलाही जबरदस्त हदरे बसले, त्यांच्याही ३०-३५ आमदारांनी बंड पुकारले... फोडाफोडीने उडालेल्या राजकीय वादळाचा धुरळा खाली बसत नाही, तेवढ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीने राजकीय गोंधळ उडाला. या भेटीवरून 'अलर्ट' झालेल्या शिवसेना आणि काँग्रेस आता आघाडीतून राष्ट्रवादीला 'साइड कॉर्नर' करीत लढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

अशातच काँग्रेस फुटीचे भाकीत मांडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सर्वपक्षीय सरकार उभारण्याचे संकेत दिले. त्यामुळे राज्यात पुन्हा फोडाफोडी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसे झाल्यास पुन्हा राजकीय भूकंप घडू शकतो. मात्र, राणेंच्या दाव्याने काँग्रेस फुटीच्या उंबरट्यावर असल्याचे तूर्त तरी दिसत आहे. परंतू, या फुटीत काँग्रेसचे कोणते आमदार असावेत, याची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू आहे.

NCP, BJP, Shivsena , Congress
Sharad Pawar Beed Sabha: धनंजय मुंडेंची बारी आलीच; शरद पवार बीडच्या आखाड्यात उतरणार

काँग्रेसचे काही आमदार लवकरच भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा करत आम्ही सर्वपक्षीय सरकार स्थापन करत आहोत, असे मोठे विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. राणेंनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना केलेल्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात पु्न्हा एकदा उलट-सुलट चर्चा झडत आहेत. याआधीही काँग्रेस फुटणार आणि या पक्षाचे डझन-दीडडझन आमदार भाजपात जाणार असल्याची चर्चा कानावर होती. त्यात भर पडून आता राणेंनी नव्या चर्चेला वाव दिला.

NCP, BJP, Shivsena , Congress
Nashik News : गिरीश महाजनांसमोरच भावा-बहिणीचा आत्मदहनाचा प्रयत्न: पोलिसांमुळे थोडक्यात बचावले...

"'इंडिया' आघाडीत कितीही पक्ष एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे आता शरद पवार आणि काँग्रेस एकत्र आले तर काय फरक पडणार? महाविकास आघाडीत ते तिघे होते, तरी देखील ते काही करू शकले नाहीत. आताही ते काही करू शकणार नाहीत, त्यामुळे काहीही होणार नाही. पण आता काँग्रेसचेही काहीजण आमच्याकडे येतील आणि आम्ही सर्व पक्षाचे सरकार स्थापन करणार आहोत", असा दावा राणेंनी केला. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात अजून काही घडामोडी घडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com