आ देखे जरा किसमें कितना है दम...! मलिकांचं भाजप नेत्याला खुलं आव्हान

मलिक यांच्याकडून सातत्याने विरोधी पक्षांतील नेत्यांवर टीका केली जाते.
NCP leader Nawab Malik
NCP leader Nawab MalikSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून सातत्याने विरोधी पक्षांतील नेत्यांवर टीका केली जाते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले होते. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin darekar) यांना मलिकांनी खुलं आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता मलिक आणि दरेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मलिकांविरोधात हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. याबाबतची माहिती दरेकारांनी ट्विटवरून सोमवारी दिली होती. 'नवाब मलिकांच्या विरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे,' असं दरेकरांनी म्हटलं होतं.

NCP leader Nawab Malik
मलिकांना आता दरेकरांनी आणलं अडचणीत; उच्च न्यायालयात गेलं प्रकरण

त्यावर मलिकांनी मंगळवारी सकाळी ट्विट करत दरेकरांना खुलं आव्हान दिलं आहे. 'आ देखे जरा किसमें कितना है दम', अशी ओळ पोस्ट करत मलिकांनी न्यायालयीन लढाईसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता फडणवीस यांच्यापाठोपाठ मलिक अन् दरेकर यांच्यातही वाद वाढण्याची शक्यता आहे. मलिकांनी फडणवीस ड्रग्ज कनेक्शनवरून गंभीर आरोप केले होते.

मलिकांवर हजार कोटीचा दावा का?

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुंबई उच्च न्यायालयात तब्बल हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने सोमवारी मलिक व इतर सात जणांना सहा आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे. मलिक व इतरांनी 1 ते 4 जुलै या कालावधीत बँकेची बदनामी करणारे होर्डिंग मुंबईतील वर्दळीच्या रस्त्यांवर लावले होते. लाखो मुंबईकरांनी ते पाहिल्याने बँकेची प्रतिमा मलिन झाल्याचा दावा बँकेचे वकील अखिलेश चौबे यांनी न्यायालयात केला.

मलिक आणि इतरांनी कोणत्याही अटींशिवाय जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी दाव्यात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी आधी होर्डिंग लावले होते तिथेच होर्डिंग लावून माफी मागण्यात यावी, असंही त्यात म्हटलं आहे. तसेच मलिक व इतरांनी एकत्रित किंवा स्वतंत्रपणे एक हजार कोटी रुपये बँकेला द्यावेत, असे आदेश देण्याची मागणीही दाव्यात करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने मलिक व इतरांना सहा आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com