Anand Dighe Memorial : ठाण्याच्या महापौर निवासात होणार आनंद दिघेंचे स्मारक; अर्थसंकल्पात 5 कोटींची तरतूद!

Thane Mayor Residence : ठाण्याच्या महापौर निवासात होणार आनंद दिघेंचे स्मारक; अर्थसंकल्पात 5 कोटींची तरतूद
Anand Dighe
Anand DigheSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : मागील काही वर्षांपासून दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून केली जात होती, त्यानुसार गेल्या काही अर्थसंकल्पांत दिवंगत दिघे यांच्या स्मारकासाठी तरतूदही करण्यात येत होती.

पण, स्मारक काही उभे राहू शकले नाही, तर आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून यंदाच्या अर्थसंकल्पात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईतील महापौर निवास येथील स्मारकाप्रमाणे आनंद दिघे (Anand Dighe)यांचे स्मारक हे उपवन येथील ठाणे महापौर निवास या वास्तूमध्ये करण्याचे प्रयोजन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने करण्यात आले आहे. त्याचबरोबर महापौर निवास हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्याचे प्रयोजन केल्याने महापालिका निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या नव्या महापौरांना महापौर निवास या वास्तूत राहण्यासाठी ते उभे राहण्याची वाट पाहावीच लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anand Dighe
TMC Budget 2024 : ठाणे महापालिकेच्या बजेटवर मुख्यमंत्र्यांची छाप; 'ठाणे बदलतंय' तरीही योजना जुन्याच

अर्थसंकल्प मांडताना आयुक्तांनी, 'ठाणेकरांचे श्रद्धास्थान असलेले धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक ठाणे शहरात हवे, अशी लोकभावना आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्या निर्देशानुसार उपवन येथील महापौर निवास या वास्तूमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक करण्याचे प्रयोजन आहे. तसेच सभोवतालच्या परिसराचादेखील विकास केला जाणार आहे. यासाठी या अर्थसंकल्पात 5 कोटींची तरतूद केली आहे.' असे स्पष्ट केले आहे.

शिवाय महापौर निवास हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्याचेही प्रयोजन आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 01 कोटीची तरतूद प्रस्तावित केलेली आहे. त्यातच महापौर निवाससाठी जागेची पाहणी केल्याचे या वेळी आयुक्तांनी सांगितले.

Anand Dighe
Fadnavis Vs Pawar : पवारांनी सज्जड दम भरल्यानंतर शेळकेंच्या मदतीला धावून आले फडणवीस; म्हणाले...

याचबरोबर आनंदाश्रम परिसर सुधारणा करण्यासाठी ही अर्थसंकल्पात 01 कोटीची तरतूद प्रस्तावित केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तसेच ठाणेकरांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदाश्रम परिसराचा सौंदर्यात्मक विकास करण्यासाठी व सुशोभित पदपथ, आकर्षक रस्ते दुभाजक, शोभिवंत दिवे, साईनेजेस, भिंत्तीपत्रे, म्युरल्स इत्यादी बाबी करण्याचे नियोजित असल्याचेही आयुक्तांनी या वेळी सांगितले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com