Andheri By election : मराठी मतदारांना अमराठी उमेदवार 'पटेल' का ? ; लटकेंना एकगठ्ठा मराठी मते मिळतील ?

Andheri By election : मुस्लिम मतदार कुणाच्या पारड्यात आपली मते टाकणार यावर निकाल ठरणार आहे.
Rituja Latke, Murji Patel
Rituja Latke, Murji Patelsarkarnama

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघात प्रचाराला (Andheri By election) वेग आला आहे. ठाकरे गट- शिंदे गट-भाजप यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे. शुक्रवारी दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर सध्या बैठकांचे सत्र सुरु असून मतदारांच्या भेटीगाठी सुरु आहेत. (Andheri By election latest news)

ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पटेल कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याने लटके-पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे. ठाकरे गटाकडून लटके यांच्या जवळचे संदीप नाईक यांचा पर्यायी निवडणूक अर्ज भरला आहे. या मतदार संघातील मतदारांविषयी जाणून घेऊया!

अंधेरी पूर्व मतदारसंघात मराठी,उत्तर भारतीय,मुस्लिम, गुजराती,दाक्षिणात्य,ख्रिश्चन आदींचा या समावेश आहे. महानगरपालिकेचे ८ प्रभाग अंधेरी पूर्व मतदारसंघात येतात. यातील ५ प्रभागांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत. दोन भाजपचे व एक काँग्रेसचा नगरसेवक आहे.

Rituja Latke, Murji Patel
शिवसेनेचा काटा काढण्यासाठी शिंदेंचा वापर ‘कॉण्ट्रक्ट किलर’ प्रमाणे भाजप करतोय !

या मतदार संघात मुस्लिमांची सुमारे ३३ हजार मते आहेत. ही मतेही या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. तसेच दाक्षिणात्य आणि ख्रिश्चन मतेही महत्त्वाची आहेत. लटके आणि पटेल यांच्याशिवाय या मतदारसंघात चार इतर उमेदवार असून ते किती मते घेतात यावर निवडणूकीचा निकाल अवलंबून आहे. ऋतुजा लटकेंची भिस्त लाखभर मराठी मतांवर आहे, तर पटेलांची मदार 88 हजार अमराठी मतांवर आहे. तर मुस्लिम मतदार कुणाच्या पारड्यात आपली मते टाकणार यावर निकाल ठरणार आहे.

मराठी एकगठ्ठा मते लटके यांच्याकडे वळली तर त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे. तर उत्तर भारतीय, गुजराती यासह मराठी मते आपल्याकडे वळवण्यासाठी पटेल यांनाही कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.

२०१९ च्या निवडणुकीतील मतदान

  1. २०१९ मध्ये मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून येथून ४५ हजार मते घेतली होती.

  2. काँग्रेसच्या अमीन कट्टी यांनी २७ हजार मते घेतली होती.

  3. शिवसेनेच्या रमेश लटके यांचा १५ हजार मतांनी विजय झाला होता.

अंधेरी पूर्व मतदारसंघातील मतदारांची संख्या

  1. मराठी-१ लाख ५ हजार

  2. उत्तर भारतीय-५८ हजार

  3. मुस्लिम-३८ हजार

  4. गुजराती-३३ हजार

  5. दाक्षिणात्य-१९ हजार

  6. ख्रिश्चन-१४ हजार

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे -:

१) ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२) मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

३) राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

४) बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)

५) मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

६) चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

७) चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

८) निकोलस अल्मेडा (अपक्ष)

९) नीना खेडेकर (अपक्ष)

१०) पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

११) फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

१२) मिलिंद कांबळे (अपक्ष)

१३) राजेश त्रिपाठी (अपक्ष)

१४) शकिब जाफर ईमाम  मलिक (अपक्ष)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com