Reshma Bhosale News : अनिल भोसलेंच्या पत्नी रेश्मा भोसले यांना तोतया 'ईडी' अधिकाऱ्याने मागितली खंडणी!

Reshma Bhosale and fake 'ED' officer : वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; अनिल भोसलेंना 'ईडी'च्या गुन्ह्यातून बाहेर करण्यासाठी मागितली खंडणी
Reshma Bhosle
Reshma BhosleSarkarnama
Published on
Updated on

Anil Bhosale and Reshma Bhosale : पुण्यातील शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना एका तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Reshma Bhosle
Elvish Yadav Case : 'एल्विश' प्रकरणावरून विरोधक आक्रमक, तर शिंदे-फडणवीसांकडूनही प्रत्युत्तर, म्हणाले...

अनिल भोसलेंना ईडीच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी खंडणीची मागणी करण्यात आली आहे. अनिल भोसलेंना बाहेर काढण्यासाठी तब्बल १५ कोटींची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर रेश्मा भोसले यांच्या तक्रारीनुसार वरळी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत एका तोतया ईडी अधिकाऱ्याने रश्मी भोसले यांनी फोन केल्याची माहिती आहे. पोलिस या बनावट ईडी अधिकाऱ्याचा शोध घेत आहेत.

Reshma Bhosle
Praveen Darekar : ''सत्तेत राहून मुख्यमंत्री बघेल यांनी खेळला सट्टेबाजीचा खेळ, अन् ...'' दरेकरांचा गंभीर आरोप!

या अगोदर पुण्यातील येरवडा कारागृहात असलेल्या अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले आणि त्यांच्या मुलास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट नाकारली होती. रेश्मा भोसले पुण्यातील सर्किट हाऊस येथे अजित पवारांच्या भेटीसाठी आल्या होत्या. शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अनिल भोसले व रेश्मा भोसले हे दोघेही आरोपी आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार असताना २०१९ मध्ये भोसले दाम्पत्यास बँक घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, रेश्मा भोसलेंना नंतर जामीन मंजूर झाला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com