
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी सरकारमध्ये मंत्रिमंडळाची शपथ घेतली. मात्र त्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आले नव्हते. आता दि. १७ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (ता. १४) या नऊ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात येणार आहे. (Latest Political News)
दरम्यान, बुधवारी (ता. १२) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची तासभर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी खातेवाटपाबाबत चर्चा केली माहिती आहे. यानंतर गुरुवारी (ता. १३) शिंदे-फडणवीस-पवार यांच्यातही चर्चा झालेली आहे. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याना खातेवाटप होत आहे. आज होणाऱ्या खातेवाटपास मोठा कालावधी लागल्याने सरकारवर टीका होत होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खातेवाटपास झालेल्या उशिराने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खोचक टोला लगावला आहे. देशमुख म्हणाले, कुणाला कुठले खाते द्यायचे हे दिल्लीत ठरले. आता दिल्लीवरून यादी निघाली आहे. राज्यात येईल त्यावेळी खातेवाटप जाहीर होईल." दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खातेवाटप होत असताना दुसरीकडे शिंदे गटाच्या नाराज आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.
आता खातेवाटपाबाबत घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी घेऊन राज्यपालांकडे पोहचले आहेत. खातेवाटपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मी वेगवेगळ्या मान्यवरांच्या मंत्रीमंडळात काम केले आहे. खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेणार आहेत."
दरम्यान, अजित पवार यांना अर्थखाते देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच इतरांना कुठले खाते मिळणार याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपच्या मंत्र्याकडे असलेली अतिरिक्त खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार संभाव्य मंत्रिपदाची यादी अशी आहे.
अजित पवार - अर्थमंत्री
दिलीप वळसे पाटील - सहकार खाते
धनंजय मुंडे - कृषीमंत्री
छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा
धर्मरावबाबा अत्राम - औषध व प्रशासन
अनिल पाटील - क्रीडा मंत्री
अदिती तटकरे - महिला व बालकल्याण
हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.