Anjali Damania : भुजबळांची तक्रार घेऊन दमानिया मुख्यमंत्री शिंदेंच्या दरबारात ; म्हणाल्या...

Chhagan Bhujbal : अजित पवाराकडून उत्तर नाही, पण सुप्रिया सुळेंनी चौकशी केली
Eknath Shinde, Anjali Damania, Chhagan Bhubal
Eknath Shinde, Anjali Damania, Chhagan BhubalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : सामाजिक कार्यकर्त्या व भ्रष्टाचारविरोधी लढ्यातील नेत्या अंजली दमानियांनी पुन्हा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. मनोज जरांगे पाटलांवर भुजबळांनी केलेल्या जोरदार हल्ल्यानंतर दमानिया आक्रमक झाल्या आहेत.

भुजबळांनी फर्नांडिस कुटुंबाची जमीन हडपल्याचा आरोप दमानियांनी केला. या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर सांताक्रुज येथील भुजबळांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचाही इशाही त्यांनी दिला आहे. आता भुजबळांची तक्रार घेऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दार ठोठावले आहे.

Eknath Shinde, Anjali Damania, Chhagan Bhubal
Ajit Pawar : केंद्राचा निधी मिळवण्यासाठी अजित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...

याबाबत दमानियांनी सांगितले, 'फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी मुख्यमंत्री शिंदे यांना मॅसेज केले होते. त्यांनी फर्नांडीस कुटुंबास न्याय देणार असे सांगितले आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिलेली आहेत.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या फर्नांडिस कुटुंबाची परिस्थिती गंभीर आहे. त्यांनी दागिने विकून काही गरजा पूर्ण केल्या आहेत. मला नेहमी वाटाते की मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. त्यामुळे पीडित लोकांना न्याय मिळेल, अशी अशा आहे. आता ती अशा खरी आहे की खोटी आहे ते भविष्यात कळेल, असेही दमानिया म्हणाल्या.

'अजित पवार घटकडून काहीही निरोप किंवा उत्तर नाही. पण सुप्रिया सुळे यांनी विचारपूस केली आहे. या कुटुंबाला दीड वर्ष न्याय मिळत नव्हता, आता आम्ही अशादाई आहोत. पण जरागे पाटलांबाबत जे शब्द वापरले त्यामुळे भुजबळांना धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाही,' असा इशाराही दमानियांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde, Anjali Damania, Chhagan Bhubal
Baba Ramdev : सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेवांना झापले ; 'हे' आहे कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com