Hitendra Thakur News : 'अप्पा, तुमच्या वसई-विरारमध्येही शासन आपल्या दारी येणार'; नव्या सरकारमधील हितेंद्र ठाकुरांचे महत्व मुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे वादाच्या पार्श्वभूमीवर आज एकाच हेलिकॉप्टरमधून पालघरला आले होते.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Palghar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या निमित्ताने पालघरमध्ये होते. शिवसेनेच्या जाहिरातीनंतर उठलेल्या वादानंतर दोघे प्रथमच एकत्र आले होते. कार्यक्रमात त्यांनी आम्ही एकत्रच आहोत, असे ठासून सांगत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना कुरवळले. भाषणात दोघांनीही बहुजन विकास आघाडीचे प्रमुख ठाकूर यांचा उल्लेख करत आप्पांचा भाव वधारल्याचे अधोरेखित केले आहे. (Appa, even in your Vasai-Virar will Shasan apali dari : Eknath Shinde)

मुख्यमंत्री शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) हे वादाच्या पार्श्वभूमीवर आज एकाच हेलिकॉप्टरमधून पालघरला आले होते. त्या ठिकाणी त्यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मागील दोन ते तीन दिवसांतील घडामोडींवर भाष्य करत विरोधकांना इशारा दिला. तकलादू जाहिरातीमुळे युतीत कोणताही तणाव नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले, तर माझी आणि फडणवीसांची जय वीरुची जोडी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे आमच्यात कोणताही वाद नसल्याचे दोघांनी दाखवून दिले.

Devendra Fadnavis
Solapur 'Siddheshwar's Chimeny Collapsed : सिद्धेश्वर साखर कारखान्याची बहुचर्चित ९२ मीटर उंचीची चिमणी अखेर जमीनदोस्त

वसई विधानसभा मतदारसंघाचे आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांचा उल्लेख मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार केला. ‘आप्पा, तुमच्या वसई विरारमध्ये अनेक विकासाच्या योजना राबवल्या जाणार आहेत. तसेच, शासन आपल्या दारी या योजनेसाठी देखील आम्ही येणार आहोत, असा वारंवार ठाकूर यांचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ आमदार म्हणून सन्मानाने ठाकूरांचे नाव पुकारले.

Devendra Fadnavis
Dispute In BJP-Shivsena : नाराजी कायम; वादानंतर एकत्र आलेले शिंदे-फडणवीस स्वतंत्र गाडीने गेले पालघरच्या कार्यक्रमस्थळी...

शिंदे-फडणवीसांचे सरकार येण्यापूर्वी झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेत्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्यांनी आपण कोणाला मतदान करणार आहोत, याचा थांगपत्ता लागू दिला नव्हता. मात्र, निवडणुकीवेळी झालेल्या घोडेबाजाराच्या टिपण्णीबाबत नाराजी व्यक्त करत आपले मतदान कोणाला झाले हे निकालानंतर स्पष्ट होईल, असे सांगितले हेाते. तसे ते मतदान कोणाला झाले आहे, याबाबत नव्या सरकारच्या शपथविधीनंतर संकेतही दिले होते.

Devendra Fadnavis
Fadnavis - Shinde Friendship: '' आमची दोस्ती 'फेव्हिकॉल'चा जोड,कितीही प्रयत्न...''; मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना फटकारलं

आजच्या कार्यक्रमात त्यांना मिळालेला मानसन्मान आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून आदराने झालेला उल्लेख पाहता नव्या सरकारमध्ये आप्पांचा भाव चांगलाच वधारल्याचे दिसून आले. पूर्वी शिंदे शिवसेनेत असताना ठाकूर यांच्याशी त्यांचे तेवढे सख्य नव्हते. मात्र, नव्या सरकारमध्ये हितेंद्र ठाकूरचा मानमतराब वाढल्याचे दिसून येत आहे.

फेविकॉल का जोड तुटेगा नही

जाहिरातींवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांनी ये फेविकॉल का जोड है तुटणार नाही. जे स्वार्थासाठी एकत्र आले, त्यांना जनतेने बाजूला केले, मिठाचा खडा बाजूला केला. आमच्या सरकारमध्ये दरी निर्माण होणार नाही, असं स्पष्ट करत आमचे सरकार घरी बसून आदेश देणारे सरकार किंवा फेसबुक सरकार नाही, असे सांगत विरोधकांना टोला लगावला.

Devendra Fadnavis
Siddheshwar Sugar Factory : ‘सिद्धेश्वर’च्या चिमणीबरोबरच भाजपच्या व्होट बँकेला सुरुंग..? ‘प्लॅन बी’कडे लक्ष

फडणवीसांकडून चर्चेला पूर्णविराम

कोणाच्या जाहिरातीमुळे, वक्तव्यामुळे हे सरकार पडणार नाही हे, तकलादू सरकार नाही. आमचा प्रवास २५ वर्षाचा आहे. वर्षभरापूर्वी हा प्रवास अधिक घट्ट झाला आहे, याची आठवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना करून दिली. जाहिरातींबाबतीत सुरु असलेल्या चर्चेला पालघरमध्ये पूर्ण विराम दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com