Bachchu Kadu To Aditya Thackeray: जुगार अड्डयावर बसला आहात का ?; बच्चू कडूंनी आदित्य ठाकरेंना झापले..

Maharashtra Politics : आदित्य ठाकरेचं नाव घेऊन त्यांच्यावर संताप व्यक्त केला.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिंदे गटातील आमदार बच्चू कडू आणि ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात अधिवेशनात वाद झाला. बच्चू कडू यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "सभागृहात बसला आहात की जुगार अड्ड्यावर," अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना झापले.

बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत होते. त्यावेळी सभागृहात ठाकरे गट राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे नेते गप्पा मारत होते. यावर कडू संतप्त झाले. त्यांनी आदित्य ठाकरेचं नाव घेऊन त्यांच्यावर संताप व्यक्त केला. सभागृहातील गोंधळावर बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले.

Bacchu Kadu
Pune BJP Politics : लांडगे, पांडेंच्या जबाबदारीचा गोंधळ बावनकुळेंनीच मिटवला..

अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. वृक्ष लागवड योजनेवरून यावेळी सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले. राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड केल्याचा दावा भाजपा सरकारने याआधी केला होता. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात चौकशी समिती नेमली होती. आज या समितीतील सदस्य संख्या वाढवावी, असा प्रस्ताव मांडला होता. चौकशी अहवाल पुढील अधिवेशनात पहिल्या आठवड्यात मांडावा अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावेळी जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला घेरलं.

विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सुरक्षितेवर सविस्तर स्पष्टीकरण केलं. महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचार आणि त्यांच्या अपहरणांसंबंधीची आकडेवारी फडणवीस यांनी सांगितली. "राज्यात दररोज 70 मुली गायब होत असल्याची माहिती खरी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेकवेळा महिला घरातून निघून जात असल्याचेही त्यांनी सांगितले. "मुंबई इतर मोठ्या शहराच्या तुलनेत महिलांना सुरक्षित वाटते. मुंबईत महिला रात्री-अपरात्री प्रवास करतात, असे ते म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com