Arun Gawli: 'डॅडी' निर्दोष, पण मुक्काम जेलमध्येच राहणार; डॉन दाऊदच्या शार्प शुटरला जामीन

Special MCOCA court acquits Arun Gawli in extortion case: 2008 सालच्या खंडणी प्रकरणात या गुन्ह्यात गवळीसह एकूण नऊ आरोपी होते. खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला, तर दुसरा माफीचा साक्षीदार बनला.
Arun Gawli
Arun Gawli Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीवर खंडणी, खून, अपहरण, धमकी असे विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबई (Mumbai) मधील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात तसेच इतर गुन्ह्यांमध्ये गवळीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.

जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अरूण गवळीला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याची 2008 सालच्या खंडणी प्रकरणातून विशेष मोक्का न्यायालयाने बुधवारी निर्दोष सुटका केली आहे.

दुसरीकडे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी तारिक परवीन याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तारिक परवीन याला 2020 मधील खंडणी प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

2008 सालच्या खंडणी प्रकरणात या गुन्ह्यात गवळीसह एकूण नऊ आरोपी होते. खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला, तर दुसरा माफीचा साक्षीदार बनला. गवळीसोबतच त्याचा भाऊ विजय अहिर आणि टोळीतील अन्य पाच सदस्यांनाही मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष मोक्का न्यायालयाने या खंडणी प्रकरणात निर्दोष ठरवले.

Arun Gawli
Tejasvi Ghosalkar: घोसाळकरांची नाराजी ठाकरे दूर करतील का? 'मातोश्री'वरील भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर काय म्हणाल्या?

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) स्थापन झालेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्ष अरुण गवळी आणि इतर आरोपींवरील खंडणीचा आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला, असे मत न्यायाधीश बी. डी. शेळके आरोपींची निर्दोष सुटका करताना नोंदवले आहे.

खंडणी प्रकरणात गवळीची निर्दोष सुटका झाली असली तर गवळी याला अजूनही कारागृहातच रहावं लागणार आहे.जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरूण गवळी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

दाऊद इब्राहिम याचा सहकारी तारिक परवीन मागील पाच वर्षांपासून तळोजा कारागृहात कैद होता, मात्र हा खटला पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला. खटल्याविना कारावास म्हणजे शिक्षा ठोठावल्यासारखे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com