पुणे : राज्याच्या राजकारणात ज्यावेळी राजकीय नेते आणि दाऊदचा (Dawood Ibrahim) संबध हा विषय येतो तेव्हा हा सर्व खेळ वाटतो. गेले कित्येक वर्ष तेच चाललं असून लोकांना भुरळ घालण्यासाठी हा खेळ आहे. राज्यातील (Maharashtra) अनेक राजकीय नेत्यांचे दाऊदशी संबध असल्याने दाऊदला भारतात आणले जात नसल्याचा दावा गँगस्टार अरुण गवळीच्या पत्नी आशा गवळी (Asha Gavli) यांनी पुण्यातील वडगाव पीर येथे 'साम'शी बोलताना केला आहे.
आशा गवळी म्हणाल्या, जेव्हा दाऊदशी राजकीय नेत्याच्या संबधाचा विषय येतो तेव्हा हा सर्व मला खेळ वाटतो. गेले कित्येक वर्ष तेच ते चालले असून लोकांना भुरळ घालण्यासाठी हे सर्व चालले आहे. जे कर्तव्य करायचे होते ते काहीही आतापर्यंत घडले नाही. बॉम्बस्फोटात गुन्हेगार असलेल्या दाऊदला कधीच आणायला हवे होते. मात्र, तसे काही घडले नाही. याबाबत ज्या वारंवार चर्चा होतात आणि लोकांना फसवले जाते हे काही मला पटत नाही. बोलायला माझ्याकडे भरपूर आहे. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचा दाऊदला पाठिंबा आहे. यामुळे दाऊदला पकडण्याची कुणाची हिंमत नाही, असा गौप्यस्फोट आशा गवळी यांनी केला आहे.
फक्त दाऊदला पकडूनच चालणार नाही. यामध्ये अनेक राजकीय नेते, बॅाम्बस्फोटबुद्धीचे लोकांचा संबध आहे. जे हा सर्व खेळ करतात मात्र, जग त्याला बारकाईने पाहत नाही. यामुळे महाराष्ट्राची वाट लागली. यामध्ये आपल्या राज्यातील गरिब जनता, शेतकरी आणि तरूण मंडळी भरडली जात आहे याच दु:ख वाटतं. याचबरोबर 1993 च्या बॉम्बस्फोटाती गुन्हेगारांना पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान झाले तेव्हाच दाऊदला भारतात आणायला हवे होते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.