Aryan Khan:साठ दिवसात आरोपपत्र दाखल करा ; NCBला न्यायालयाने सुनावले

आज १८० दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही यात अद्याप चार्जशीट दाखल करण्यात आलेले नाही.
Aryan Khan
Aryan Khansarkarnama
Published on
Updated on

मुंबई : बॅालिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या (Aryan Khan drugs case) क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने एसआयटीला साठ दिवसाचा कालावधीला दिला आहे.

कोर्टाकडून मिळालेल्या या अतिरीक्त कालावधीत आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी (NCB)आपला उर्वरित तपास पूर्ण करुन आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे. आर्यन खानवर ड्रग्ज सेवनासह इतर अनेक आरोप आहेत. आर्यन खान 28 ऑक्टोबर 2021 पासून जामिनावर बाहेर आहे. ( Aryan Khan drugs case news update)

आर्यन खान यांच्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला राजकीय वळण लागल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांना या प्रकरणावरुन बाजूला हटविण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनसीबीनं एसआयटीकडे (SIT)सोपविला होता. आज (३१ तारखेला) १८० दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही यात अद्याप चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही. यापूर्वी तपास यंत्रणेला 2 एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल करायचे होते.

Aryan Khan
विनयभंग प्रकरणी पोलीस अधिकारी निशिकांत मोरे यांना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांचा अतिरीक्त कालावधी वाढवून देण्याची मागणी विशेष NDPS कोर्टाने फेटाळून लावली. कोर्टाने एसआयटीला साठा दिवसाचा अवधी दिला आहे. विशेष न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी आज हा अतिरीक्त कालावधी NCB ला मंजूर केला आहे.

एनसीबीने आर्यन खानशी संबंधित क्रूझ प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त 90 दिवसांची मागणी करणारा अर्ज मुंबईतील सत्र न्यायालयात गेल्या सोमवारी दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आपला निकाल राखून ठेवला होता.

या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून एजन्सीचा तपास पूर्ण झालेला नाही, त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, असा युक्तिवाद एनसीबीने न्यायालयात केला होता, जो आज न्यायालयाने मान्य केला आहे.

Aryan Khan
ED कारवाई हा चिंतेचा नव्हे गमतीचा विषय ; पटोलेंवर छापा पडला तरी आश्चर्य नाही!

याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या २० आरोपींपैकी १८ आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला असून उर्वरित दोन आरोपी अद्याप जेलमध्ये आहेत.

या प्रकरणातला तपास अद्याप बाकी असून आपल्याला अतिरीक्त वेळ का मिळावा यासाठीची १५ कारणं NCB ने कोर्टासमोर सादर केली. मोहक जस्वाल, गोमीत चोप्रा, नुपूर सातिजा, अब्दुल कादर शेख, चिनेडु इग्वे, ओकोरा उझेओमा या संशयित आरोपींची चौकशी झाली असून उर्वरित आरोपींचा तपास अद्याप बाकी आहे.

कॉर्डेलिया क्रूझ 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय पोर्ट टर्मिनलवरून गोव्यासाठी रवाना झाली. आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर आणि त्यानंतर त्याला अटक केल्यानंतर एनसीबीने अनेकांना ताब्यात घेतले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com