Ashish Shelar : नक्षलवाद्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका आहे का? शेलारांचा अजित पवारांना सवाल!

Ashish Shelar : माझं सगळ्या साहित्यिकांना प्रश्न आहे की, तुमचा नक्षलवाद्यांना समर्थन आहे का ?
Ashish Shelar
Ashish Shelar Sarkarnama
Published on
Updated on

Ashish Shelar : कोबाड गांधी लिखित आणि अनघा लेले यांनी अनुवादीत केलेल्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या पुस्तकाला राज्यशासनाकडून जाहीर झालेला पुरस्कार, जीआर काढून अचानकपणे रद्द केला आहे. यामुळे आता अनेक लेखकांकडून याचा निषेध केला जातोय. विरोधीपक्षनेते अजित पवार यावर म्हणाले, "साहित्य क्षेत्रातील राज्य सरकारचा हस्तक्षेप निषेधार्ह आहे. सरकारने जाहीर केलेले पुरस्कार रद्द केले. साहित्य क्षेत्रात राजकीय नेत्यांनी ढवळाढवळ करु नये" पवारांच्या या टिकेनंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी अजित पवारांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना, आशिष शेलार यांना म्हंटले की, "या पुस्तकप्रकरणी सरकारने जी भूमिका घ्यायची ती घेतली आहे. याबाबत उत्तरही दिलं आहे. तुमची भूमिका ही नक्षलवाद्यांना प्रोत्साहन देण्याची आहे का ? याचं उत्तर अजित पवार यांनी द्यावं. माझं सगळ्या साहित्यिकांना प्रश्न आहे की, तुमचा नक्षलवाद्यांना समर्थन आहे का ? त्यांनी जाहीर भूमिका मांडावी.

Ashish Shelar
Nitesh Rane : 'मी हक्काने ते वक्तव्य केलं,आताही सांगतो...'

यावेळी बोलताना शेलार पुढे म्हणाले, या प्रकरणाच्या अनुषंगाने मला त्यांच्या सरकारच्या काळातील प्रकरणे बाहेर काढावी लागतील. शर्जिल उस्मानी यांनी केलेलं हिंदू विरोधी वक्तव्य असेल, त्याचप्रमाणे अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातील अब तक जिंदा है वगैरे घोषणा असतील,हे मागील सरकारमध्ये घडलेलं होतं.

Ashish Shelar
''साहित्य क्षेत्रात राजकीय नेत्यांची ढवळाढवळ नको...''; अजितदादांनी टोचले शिंदे सरकारचे कान

तसेच त्यांनी यावेळी शेलार यांनी राज्यपालांच्या वादावरही भाष्य केले. राज्यपाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्याविरोधात विरोधकांकडून विनाकारणचा हा मोर्चा काढला जात आहे. या मोर्चामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होईल, मुंबईकरांच काही यात भल नाही. लव्हजिहाद प्रकरणी बोलताना शेलार म्हणाले, लव्ह जिहाद या प्रश्नावर विचार करण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे.

मोर्चा काढणाऱ्या पक्षांनी आपली याबाबत भूमिका स्पष्ट करावी. रस्ते, पाणी अशा समस्यांवर त्यांनी मोर्चे काढायला हवे होते, मात्र विरोधक या प्रश्नांवर बोलताना दिसत नाहीत, असे शेलार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com