मुंबई : राज्यात भोंग्याच्या मुद्यावरुन राजकारण तापले आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सूचनेवरुन उत्तर प्रदेशातील अनेक धार्मिक स्थळांवरील भोंगे एकतर खाली करण्यात आले आहेत नाहीतर त्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे. योगी सरकारच्या या भूमिकेचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Thackeray government) टीका केली आहे.
"उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दमदार नेतृत्व आहे. आता राज्यातील नेत्यांनी योगींच्या क्लास लावावा," अशा शब्दात आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. "मुंबईत भाजप स्वबळावर लढेल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपच्या काही नेत्यांचे जवळचे मित्र आहेत," असे शेलार म्हणाले.
आशिष शेलार यांनी यावेवळी काँग्रेसवर टीका केली. वीज भारनियमन एवढंच काम काँग्रेसचे आहे. काँग्रेस म्हणजे 'भुईला भार आणि विजेला भार, अशी काँग्रेसची अवस्था आहे. "राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची ऑफर असताना आम्ही नीती नियमात चाललो. माणसाचे आणि पक्षाचे रंग कसे बदलतात हे राज्याने पाहिले आहे. २०१४ ला शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता. आधी वलग्ना करत होते आणि मग हात जोडून आम्हाला घ्या, असे सांगत होते. तुम्ही तिघे एकत्र आला तरी आम्ही पटकी देऊ आणि राज्य पूढे घेऊन जाऊ," असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.
"राजकारणात काहीही होते जे काल हिंदुत्ववादी होते ते आज सेक्युलर झाले. जे काँग्रेसचे तोंड देखील बघत नव्हते ते त्याच्या फोटोसमोर झुकताना पाहिले. आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही. आता तीन गडी विरुद्ध एक असा सामना आहे. पण सामना आम्ही जिंकू," असे शेलार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.