'थोडी तरी शरम करा' ; किशोरी पेडणेकरांवर शेलारांचा हल्लाबोल

महापौर किशोरी पडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुंबईतील ४२ हजार खड्डे भरल्याचा दावा केला. या दाव्यावरून आशिष शेलार यांनी पेडणेकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.
Kishori Pednekar, ashish shelar
Kishori Pednekar, ashish shelarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईतील खड्डे हा विरोधी पक्षाच्या टीकेचा तर मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. दरवर्षाप्रमाणेच यंदा मुंबईतील खड्ड्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खड्डे बुजवण्यात गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करणार असल्याचं नुकतेच जाहीर केले होते. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुंबईतील ४२ हजार खड्डे भरल्याचा दावा केला. या दाव्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी पेडणेकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. पत्रकार परिषदेत शेलार यांनी ही टीका केली आहे.

आमदार आशिष शेलार म्हणाले की, महापौर पेडणेकर म्हणतात आम्ही ४२ हजार खड्डे बुजवले. थोडी तरी शरम करा. कंत्राटदाराला खड्डे बुजवण्याचे जास्त पैसे मिळावेत म्हणून शिवसेना त्याच्या समर्थनाच्या भूमिका का घेतेय? मुख्यमंत्री म्हणतात कंत्राटदारांवर कारवाई करा. पण वर्षभरात महापालिकेने एकाही कंत्राटदारावर कारवाई केलेली आहे का?

शेलार म्हणाले की, आता महापौरांचा प्रवास म्हणजे त्यांना पळताभुई थोडी झाली आहे, गणपतीपूर्वी पावसाळ्याच्या काळात महापौर महोदयांनी ही पाहणी केली असती तर जनतेला खरे वाटले असते. आता त्यांचा प्रवास आणि धावपळ ही पळताभुई थोडी आहे. आता मुंबईकर नागरिकांची त्रस्त भावना दिसते आहे. निवडणुका समोर आहेत, म्हणून धावाधाव सुरू आहे. कंत्राटदारांची बिलं काढण्यासाठी, एवढे खड्डे बुजवले, खड्ड्यांचे खोडे आकडे दाखवण्यासाठी, आकडे मोठे दाखवून कंत्राटदाराला मदत करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे.

मुंबईतील खड्डे बुजवण्याच्या कामात हयगय किंवा गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. यावरुन भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्यावर निशाणा साधला आहे.

Kishori Pednekar, ashish shelar
मुख्यमंत्र्यांचं वाक्य सुळेंनी केलेल्या 'सेल्फी विथ खड्डे' आंदोलनासारखं

आशिष शेलार म्हणाले, ''“मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारावर कारवाई करण्याविषयी फेकलेलं वाक्य भाषणातल्या वाक्यासारखं आहे. जर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या ज्या विविध एजन्सींच्या अखत्यारीत खड्ड्यांचं काम आहे, त्यांची बैठक घेतली असती, तर आम्हाला पटलं असतं. कंत्राटदारांवर कारवाई केली असती, तरी आम्हाला पटलं असतं”

“मुख्यमंत्र्यांचं वाक्य सुप्रिया सुळेंनी केलेल्या सेल्फी विथ खड्डे आंदोलनासारखं आहे. हे दिखाऊपणाचं आहे. यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. आता सुप्रियाताई कुठे गेल्या? सेल्फी विथ खड्डे हा कार्यक्रम कुठल्या भाषणात गेला? त्यांनीही भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती आहे”, असा टोमणा शेलारांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com