राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलं ? मलिकांच्या अटकेनंतर कॉग्रेस संतप्त

न्यायालय, पोलिस सोडून ईडी सारखी तपास यंत्रणा त्यांना अटक करीत आहे, ही चुकीची बाब आहे.
Nawab Malik, Ashok Chavan
Nawab Malik, Ashok Chavansarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक केल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. कॉग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मलिक यांच्या अटकेनंतर तपास यंत्रणेबाबत खंत व्यक्त केली आहे. ते 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले, ''नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे हे लक्षात येते. लोकशाहीत विरोध करणे, मत मांडणे, आपले विचार व्यक्त करणे चुकीचे नाही. त्याविरोधात न्यायालय आहे. पण न्यायालय, पोलिस सोडून ईडी सारखी तपास यंत्रणा त्यांना अटक करीत आहे, ही चुकीची बाब आहे,''

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम मनी लॉन्डींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, नवाब मलिक आज सकाळी अंमलबजावणी संचालनालय ईडी (ED)कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांना सात तासांच्या चैाकशीनंतर अटक करण्यात आली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Nawab Malik, Ashok Chavan
मलिकांनी आरोप केलेल्या वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

"राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik)यांचे कारस्थान हळूहळू जनतेसमोर येत आहे. आघाडी सरकारमधील सर्व घोटोळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे. मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग जवळील १९ बंगल्याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दिली,'' अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत आहे.

Nawab Malik, Ashok Chavan
EDच्या मलिकांवरील कारवाईनंतर ; क्रांती रेडकरांच्या टि्वटची चर्चा

किरीट सोमय्या म्हणाले, '' नवाब मलिकांच्या ईडी (Ed)चैाकशीच्या निष्कर्षाची वाट पाहतो आहे. मलिकांसारखे व्यक्ती मंत्रीमंडळात राहू शकत नाही, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आज मलिक यांची ईडीने चैाकशी सुरु केल्यानंतर शिवसेनेतेच खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'ईडी-किरीट सोमय्या' अशी तीच ट्यून वाजवीत आहेत,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com