निलंबित बारा आमदारांसााठी सोमवार ठरला महत्वाचा दिवस

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या आधी झिरवळ दिलासा देणार का, याची उत्सुकता
vidhansabha gondhal
vidhansabha gondhalsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधानसभेत गोंधळ (Maharashtra Assembly) घातला म्हणून निलंबित झालेल्या भाजपच्या 12 आमदारांना दिलासा मिळणार का, (Suspension 0f 12 MLAs) याचा फैसला येत्या सोमवारी (10 जानेवारी) होणार आहे. या आमदारांनी उपाध्यक्षांकडे निलंबन मागे घेण्याची मागणी केल्याने ते या आमदारांना दिलासा देणार का, याची उत्सुकता आहे.

vidhansabha gondhal
KDCC Bank Result : खासदार मंडलिकांनी विनय कोरेंना आपली ताकद दाखवून दिली...

या प्रकरणी आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर 11 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्या आधी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यापुढे विधानभवनात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या सुनावणीत याबाबत थेट आदेश दिला नाही आणि विधानसभा अध्यक्षांकडेच विनंती करण्याचे याचिकाकर्त्यांना सांगितले होते. या सर्वच आमदारांना पुढील संपूर्ण कालावधीसाठी निलंबित केल्याने भाजप नेत्यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती.

vidhansabha gondhal
Kdcc Bank Election : अखेर गुलाल यड्रावकरांवर ; राजू शेट्टींचा विरोध कुचकामी ठरला

आशिष शेलार, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं होते. तत्कालीन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष झाला आहे. त्यातून झिरवळ आता या आमदारांबाबत काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com