Assembly Elections : राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये काय होणार? निकालाच्या काही तास आधी वडेट्टीवार म्हणाले...

Vijay Wadettiwar On Assembly Election Result : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाआधी विजय वडेट्टीवार बोलले...
Vijay Wadettiwar at Nagpur.
Vijay Wadettiwar at Nagpur.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या लागणार आहेत. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. या मतमोजणीला आता काही तास उरले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरमचे निकाल लागणार आहेत. या निकालाच्या काही तास आधी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. चारही राज्यात काँग्रेस नक्कीच जिंकेल. शंभर टक्के चारही राज्यात जिंकू, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar at Nagpur.
Barsu Refinery : बारसू रिफायनरीसाठी बंद पडद्याआडचे ‘उद्योग’! कोकणवासीय वाऱ्यावर...

विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची शनिवारी विधिमंडळात बैठक झाली. या बैठकीला तीनही पक्षांचे नेते होते. आमच्या मित्रपक्षांचे नेतेही होते. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी आहे. सरकारने कालावधी वाढवून दिला पाहिजे. मागणी आम्ही करणार आहोत. राज्यातील जनतेसमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. सर्व विषय धरून पुढे कसे न्यायचे यावर चर्चा सविस्तर झाली. विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीवर राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. हे प्रश्न गंभीर असल्याचे ते म्हणाले. सरकार आज फक्त आरक्षण आणि एकमेकांवर बोलत आहे. मूलभूत विषयांना बगल देण्याचे काम सुरू आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधी बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी, अमीन पटेल, जनता दल युनायटेडचे नेते कपिल पाटील, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी आदी नेते उपस्थित होते. विरोधी पक्षांची पुढील बैठक आता ६ तारखेला होणार आहे.

Vijay Wadettiwar at Nagpur.
Raj Thackeray News : एकनाथ शिंदेंचा 'वडा' झाला की अजित पवारांचा?; वडापाव महोत्सवात राज यांचा टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com