'हाऊस मे आओ' ; विरोधकांची मुख्यमंत्र्यांना हाक, किती दिवस लपून राहणार?

"ठाकरे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्र्यांना काम जमत नाही. राज्याला कोणी वाली राहिलेला नाही,''
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : विधानसभा (Assembly Winter Session 2021) आवारात येताच पायऱ्यांवर ठाण मांडत सरकारविरोधातील आवाज बुलंद करणाऱ्या विरोधकांनी बुधवारी मात्र; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackeray government) यांना 'हाऊस मे आओ' हाक दिली. विरोधकांच्या साऱ्या घोषणाबाजीत मुख्यमंत्री ठाकरेंना घातलेली ही साद लक्ष वेधणारी ठरली.

भाजपने (bjp) आक्रमकपणे सरकारविरोधात घोषणा देत असतानाच, मुख्यमंत्री अधिवेशनाला येणारच आहेत; ते कसे आणि किती येतील, हे जाहीर होईल, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून प्रारंभ झाला; त्याआधी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ठाकरे सरकारमधील घटक पक्षांची बैठक होती. तेव्हा साडेसहाच्या सुमारास विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आपल्या आमदारांसमवेत विधीमंडळाच्या आवारात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, फडणवीस हे पायऱ्यांवर आले आणि सरकारचा निषेध केला. शेतकरी, विविध खात्याच्या परीक्षा, नोकरी भरती आणि अन्य मुद्दयांवरून फडणवीस स्वत: सरकारविरोधात घोषणा देत राहिले. त्याचवेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना उद्देशून 'हाऊस मे आओ'चा नारा दिला. शस्त्रक्रिया झाल्यापासून मुख्यमंत्री ठाकरे सरकारच्या कामकाजात नसल्याचा आरोप करीत विरोधकांनी त्यांना लक्ष केले आहे. विरोधकांना प्रत्युत्तर देत, मुख्यमंत्री अधिवेशनात राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सायंकाळीही जाहीर केले. तरीही ते येणार नसल्याकडे लक्ष वेधत विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ठाकरेंना सभागृहात येण्याची हाक दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, "ठाकरे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्र्यांना काम जमत नाही. राज्याला कोणी वाली राहिलेला नाही. त्यामुळे सगळ्याच कामात गोंधळ होत आहे. विरोधकांना न जुमानता कारभार केला जात आहे. परंतु, या सरकारला लोकांपुढे यावेच लागणार असून, किती दिवस लपून राहणार?.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com