Ganpat Gaikawad Firing Case : आमदार गायकवाडांवर 'अ‍ॅट्रॉसिटी'चं कारण काय? फिर्यादीने घटनाक्रमच सांगितला

Hill Line Police Station Firing : आमदार गायकवाड यांच्या कुठलाही जमीनीचा व्यवहार झाला नसल्याचेही फिर्यादींनी सांगितले
Ganpat Gaikawad
Ganpat GaikawadSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : हिललाईन पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांच्या विरोधात हिललाईन पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा करण्यात आला आहे. याबाबत 'सरकारनमा'ने फिर्यादीशी संवाद साधला असता त्यांनी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली.

आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांचे अंबरनाथ येथील सर्वे नंबर ६ येथील जमिनीवरून स्थानिक नागरिकांशी वाद होता. ३१ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी नीता एकनाथ जाधव आणि त्यांच्या जाऊबाई वैशाली सुनील जाधव, ज्योसना नितीन जाधव व इतर नातेवाईक हे त्या जमिनीवर गेले होते. त्यावेळी आमदार गणपत गायकवाड आणि फिर्यादी यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी आमदारांनी त्यांना जातीवाचक शब्द उच्चारल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे.

Ganpat Gaikawad
Bhaskarrao Khatgaonkar : काँग्रेसला दिलासा! खतगावकराना अटकपूर्व जामीन; काय आहे प्रकरण ?

या प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड, जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकनकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश वारघेट या सात जणांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतअ‍ॅर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आमदार गायकवाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर पैशासाठी आरोप केले आहे. मुख्यमंत्री शिंदेंवरील पैशांसंबंधी लावलेले आरोपही खोटे असल्याचे फिर्यादीने म्हटले. कारण आमदार गायकवाड यांनी आमच्यावरही खोटे आरोप लावले आहे. आमच्या जमिनीचा व्यवहार प्रमोद रंका यांच्यासोबत झाला होता. आमदार गणपत गायकवाड यांचा आणि आमचा जमिनीशी काहीही संबंध नाही, असा दावाही जाधव कुटुंबीयांनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ganpat Gaikawad
Loksabha Election 2024 : ठाकरे गटाचे खासदार असलेल्या 'या' तीन जागांवर भाजपचा 'डोळा'; लढण्याची तयारी पूर्ण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com