MNS : धक्कादायक : मनसेच्या मोठ्या नेत्यावर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोरांनी चेहऱ्यावर..

MNS Sandeep Deshpande : ते मार्निग वार्कसाठी शिवाजी पार्क येथे आले होते,
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande Sarkarnama
Published on
Updated on

MNS Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. ते गंभीर जखमी झाल्याचे समजते,

त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ते मार्निग वॉकसाठी शिवाजी पार्क येथे आले होते, तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Sandeep Deshpande
Tripura Election Result: कसब्यात दणदणीत विजय मिळविणाऱ्या काँग्रेसला फटका ; त्रिपुरामध्ये इतक्या जागांवर..

देशपांडे हे नेहमीप्रमाणे सकाळी शिवाजी पार्क येथे फिरण्यास आले होते. आज ते एकटेच होते. यावेळी तोडाला रुमाल बांधलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

देशपांडे हे समाजमाध्यमांवर नेहमीच टीका करीत असतात, त्यांचा राग मनात ठेवून हा हल्ला झाला असल्याची चर्चा आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

दादरच्या शिवाजी पार्क येथे चार अज्ञात व्यक्तींनी देशपांडेंवर प्राणघातक हल्ला केला आहे. क्रिकेटच्या स्टॅम्पने डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता, त्यामुळे त्यांना ओळखता आलेले नाही, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

या घटनेमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हा नियोजीत हल्ला असल्याचा मनसेने आरोप केला आहे. देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com