BJP : भाजप महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल

हल्ल्यामागे भाजपाच्या काही कार्यकर्त्यांचाही हात असण्याची शक्यता सुलताना यांच्या नवऱ्याने व्यक्त केली आहे.
sultana khan
sultana khansarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबई येथे मीरारोड परिसरात भाजपा (bjp) नेत्या सुलताना खान (sultana khan) यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी भर रस्त्यात हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (sultana khan news update)

सुलताना खान या भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. हल्ल्यानंतर सुलताना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुलताना या रविवारी रात्री आपल्या नवऱ्यासोबत डॉक्टरांकडे जात होत्या.

दोन दुचाकीस्वारांनी मीरा रोडजवळ त्यांची कार अडवली. त्यांच्या गाडीची काच फोडून हल्लेखोरांनी हल्ला केला. काही वेळातच तिथून पसार झाले. काल (रविवारी) अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

sultana khan
sanjay raut : बंडखोरांच्या परतीचे दोर राऊतांनी कापले ; चर्चांना पूर्णविराम

हल्ला होताच त्यांच्या पतीने आरडाओरडा सुरु केला. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले. त्यामुळे हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. पोलिसांच्या मदतीने जखमी सुलताना खान यांना जवळच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हल्ल्यादरम्यान त्यांच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही हल्लेखोरांनी शिविगाळ केली. हल्लेखोर नेमके कोण होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही, घाबरलेलल्या सुलताना अद्याप कोणाशीही बोलण्याच्या मनस्थित नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच सुलताना यांनी पक्षाच्या काही नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. या हल्ल्यामागे भाजपाच्या काही कार्यकर्त्यांचाही हात असण्याची शक्यता सुलताना यांच्या नवऱ्याने व्यक्त केली आहे. सुलताना यांच्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com