Atul Save News : सावेंच्या खासगी सचिवाने नऊ महिने केले विनानियुक्ती काम… सामान्य प्रशासनकडून नऊ महिन्यानंतर नियुक्ती

Prashant Khedekar News : राज्य शासनाच्या वतीने नियुक्तीच नसताना त्यांनी कोणत्या अधिकारात मंत्र्यांकडे तब्बल ९ महिने काम पाहिले?
Atul Save News
Atul Save NewsSarkarnama
Published on
Updated on

State Government News : सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग खाती सांभाळणारे मंत्री अतुल सावे यांचे खासगी सचिव (पीएस) प्रशांत खेडेकर यांची राज्य सरकारने तब्बल ९ महिन्यांनंतर नियुक्ती केली. विलंबाने नियुक्ती मिळवणारे खेडेकर हे एकमेव खासगी सचिव ठरले आहेत. राज्य शासनाच्या वतीने नियुक्तीच नसताना त्यांनी कोणत्या अधिकारात मंत्र्यांकडे तब्बल ९ महिने काम पाहिले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खासगी सचिव हे मंत्र्यांच्या कार्यालयाचे प्रमुख असतात. मंत्र्यांच्या वतीने विभागाला कार्यनिर्देश देऊन ते पूर्ण करून घेण्याची जबाबदारी खासगी सचिवांची असते. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अतुल सावे यांना कॅबिनेटपदाची जबाबदारी दिली. मंत्री सावे (Atul Save) यांनी १२ सप्टेंबर २०२२ रोजी उपजिल्हाधिकारी खेडेकर यांची खासगी सचिवपदी नियुक्ती करण्याचे शिफारसपत्र सामान्य प्रशासन विभागाला दिले होते.

सामान्य प्रशासन विभागाने खेडेकर यांची खातेनिहाय चौकशी (डीई) सुरू नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित होते. मात्र, खेडेकर यांची एका प्रकरणात खातेनिहाय चौकशी सुरु होती. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात खेडेकर यांची चौकशी सुरू होती. चौकशी सुरू असल्यानेच खासगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे नऊ महिने सामान्य प्रशासन विभागाकडे ही नियुक्ती प्रलंबित होती.

मात्र, सावे यांचे खासगी सचिव तब्बल नऊ महिने नामधारीच होते, राज्य सरकारने त्यांची अधिकृत नियुक्तीच केली नव्हती. मग या दीर्घ कालावधीत ते कोणत्या अधिकारात कार्यरत होते, तसेच त्यामुळे या कालावधीतील त्यांच्या कारभाराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 'डीई' निकाली काढण्यासाठी खेडेकरांची लगीनघाई सुरू होती. विभागीय आयुक्तांनी 'डीई' संदर्भात विरोधी निर्णय दिला.

त्यामुळे स्थितीत खेडेकरना राज्यपालांकडे अपील दाखल करावे लागले असते. अशा अपीलावर राज्यपाल राज्य सरकारमधील (State Government) एखाद्या मंत्र्याकडे हे प्रकरण सुनावणीसाठी पाठवतात. ही कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र, 'डीई' पूर्ण होताच सामान्य प्रशासन विभागाने नऊ महिन्यानंतर खेडेकर यांची खासगी सचिव म्हणून अधिकृत नियुक्ती केली. सामान्य प्रशासन विभागाने पूर्वलक्षी प्रभावाने १२ सप्टेंबर २०२२ पासून ही नियुक्ती केल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com