Ayodhya Paul : बेटा तुझी माझ्याशी गाठ आहे; अयोध्या पोळ यांचा केरे पाटलांना इशारा, केले गंभीर आरोप

Ramesh Kere Patil And Thackeray Matoshree : उद्धव ठाकरे यांच्या दारात जा आणि बोंब मारण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे दिलेत का?
Ayodhya Paul, Ramesh Kere Patil
Ayodhya Paul, Ramesh Kere PatilSarkarnama
Published on
Updated on

राज्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरुवातीला आंदोलक मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर सत्ताधारी होती. आता त्यांनी विरोधकांनाही आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत मातोश्रीवर गेलेल्या मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही. त्यावरून आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर निषेध नोंदवला. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी पदाधिकारी रमेश केरे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अयोध्या पोळ यांनी रमेश केरे पाटील हे सत्ताधाऱ्यांकडून पैसे घेऊन विरोधकांवर टीका करतात, असा गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या दारात जा आणि बोंब मारण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे दिलेत का, असा थेट प्रश्न पोळ यांनी केरे पाटील यांना केला आहे.

आता माझ्यावर काय दावा करायचा तो करा असे म्हणत आयोध्या पोळ यांनी केरे पाटील यांच्यावर सणसणीत आरोप केले आहेत. याच केरे पाटलांनी अधिवेशनात काय केले ते नंतर सांगते. आता त्याने येथे तोंड उघडावे. त्याला कुणी काय-काय शिकवले आहे, याचे सगळे पुरावे आहेत. हा केरे पाटील सत्तेतील लोकांकडून पैसा उकळतो, आणि उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर जाऊन भुंकतो. तू पुन्हा ये बेटा तुझी गाठ माझ्याशी आहे, असे चॅलेंजही अयोध्या पोळ यांनी रमेश केरे पाटील यांना दिले आहे.

दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळले आहे. त्यातच मराठा आरक्षणाबाबत विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीचा प्रयत्न केला. मात्र भेट झाली नसल्याने आक्रमक झालेल्या समाजाकडून मातोश्रीवर मोर्चा काढण्याची शक्यता होती. त्यामुळे मातोश्रीबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com