अयोध्या दौरा : राज आणि योगींची भेट होणार नाही....

Raj thackeray: राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
MNS Chief Raj Thackeray
MNS Chief Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी गुडीपाडव्याच्या मेळावा, ठाण्यातील उत्तर सभा आणि रविवारी झालेल्या औरंगाबदच्या सभेतून मशिदींवरील भोंगे हटविण्यासंबंधी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे.

दरम्यान राज यांनी हाती घेतलेल्या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारने एक पाऊल पुढे टाकत धार्मिक स्थळावरील सुमारे 53 हजारांहून अधिक भोंगे उतरवले आहे. अशातच ठाकरे हे 5 जूनला आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासोबत भेट होईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांची भेट होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

MNS Chief Raj Thackeray
बाबरी मशीद पाडली तेव्हा फडणवीस पळून आले होते का? : जयंत पाटलांचा उपरोधिक सवाल

राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार हे निश्चित झाले असून ते पूर्ण 1 दिवस अयोध्येत असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते केवळ राम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामांचं दर्शन घेऊनच परतणार आहेत. या दौऱ्यात ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार नसून अयोध्येत पत्रकार परिषद देखील घेणार नाहीत. याचबरोबर अयोध्येत राज ठाकरेंना राज्याच्या सरकारी पाहुण्याचा दर्जाही मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे.

राज यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी त्यांना केंद्र सरकार विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती मिळत असून सध्या त्यांना वाय प्लस सुरक्षा आहे. तसेच दौऱ्यादरम्यान योगी सरकारकडूनही त्यांना विशेष सुरक्षा मिळणार असल्याचे बोलल जात आहे.

MNS Chief Raj Thackeray
ट्रोल होताच प्राजक्ताने भोंग्यावरील ट्विट केलं डिलीट

दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरल्याने त्यांच्या सभेचा परिणाम थेट उत्तर प्रदेशात पाहायला मिळाला आहे. तिकडे प्रार्थनास्थळावरील भोंगे त्यात विशेषत: मशिदींवरील अनधिकृत भोंग्याविरोधात सरकारने कडक पावलं उचलली. असून आतापर्यंत 53 हजारांहून अधिक भोंगे उतरविण्यात आले आहे. यामुळे योगी सरकारवर राज ठाकरे खूश आहेत. शिवाय त्यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्यातूनही योगी सरकारचं कौतुक केलं होते. यामुळे राज हे आपल्या अयोध्या दौऱ्यात योगींची भेट घेतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, राज आणि योगी यांची भेट होणार नाही, अशी माहिती मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com