Baba Siddique Latest News :
काहीतरी कारण आहे म्हणूनच मी राजीनामा दिला आहे. काही गोष्टी अशा असतात की त्या न सांगणंच योग्य असतं. बऱ्याच काळापासून यावर विचार सुरू होता. आता मी निर्णय घेतला आहे. काँग्रेसला खूप शुभेच्छा आहेत. काँग्रेससोबत 48 वर्षे राजकीय प्रवास केला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी दिली.
आम्ही ज्या कुटुंबात इतकी वर्षे होतो. तिथे असतानाही अनेक मुद्द्यांवर आवाज उठवत राहिलो. त्यामुळे काही तरी ( Congress ) नक्कीच घडलं असेल की त्या कुटुंबातून बाहेर पडण्याचा निर्णय मला घ्यावा लागला. पण ते न सांगण्यासारखं आहे. एवढचं मी बोलेन. यावर जास्त काही काही बोलू शकत नाही. जे काही घडतंय ते पाहता आपण बाजूला झालेलं बरं, असं ते पुढे म्हणाले.
झिशान सिद्दीकी हे आपला निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यांचा निर्णय ते घेतील. यामुळे त्यांच्या निर्णयबाबत तुम्ही त्यांनाच विचारा, असे त्यांनी स्पष्ट केले. मी ज्या पक्षात जाईन त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेईन आणि सर्वांना कळेलच, असं त्यांनी सांगितलं. येत्या 10 तारखेला जाहीर सभा आहे. छोटीशी सभा असणार आहे. त्यावेळी आपल्या समर्थकांसह प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच बाबा सिद्दीकी यांनी केले.
अजित पवारांचं पुन्हा कौतुक
मी आधीपासूनच अजित पवारांचा प्रशंसक आहे. छोट्याशा कार्यकर्त्याच्या कामासाठी आणि त्या कामाचा पाठपुरावा घेणं, असं अजित पवारांचं काम आहे. हा त्यांचा मोठेपणा आहे. यामुळे त्यांचं कौतुक करणारच. यात दुमत नाही. मी काँग्रेसमध्ये असतानाही हेच बोलत होतो, असं सांगत बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं कौतुक केलं. इफ्तदाए इश्क है होता है क्या, आगे आगे देखो होता है क्या.., असे सूचक संकेत सिद्दीकी यांनी दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माझा प्रवास इंदिरा गांधींपासून ते राहुल गांधींपर्यंत होता. संजीव गांधी, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत माझा प्रवास झाला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पित्यासमान आहेत. काँग्रेसमधील वरिष्ठांना मी 15 दिवसांपूर्वीच माझ्या निर्णयाची माहिती दिली होती. मला समजवण्याचा आणि मन वळण्याचा मोठा प्रयत्न झाला. पण माझीही मजबुरी होती. कुटुंबात काहीतरी वेगळं चाललं असेल तर आपण बाहेर पडलेलंच बरं. या गोष्टीचं दुःखही आहे. वेदना तर होणारच, असं बाबा सिद्दीकी म्हणाले. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं यावेळी बाबा सिद्दीकी यांनी सांगून टाकलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.