Badlapur School Case : बदलापुरातील 300 आंदोलकांवर गुन्हे, शाळांना सुट्टी, इंटरनेट बंद, पोलिस बंदोबस्तात वाढ अन् बरचं काही...

Badlapur School Crime Case : बदलापुरातील दोन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर काल मंगळवारी जनक्षोभ तीव्र होता. पोलिसांनी बळाचा वापर करून जनक्षोभ मोडून काढला. या पार्श्वभूमीवर बदलापुरात आज तणावपूर्ण शांतता होती.
Badlapur Rape Case
Badlapur Rape CaseSarkarnama
Published on
Updated on

Badlapur news today : बदलापुरात आदर्श शाळेत चार वर्षांच्या दोन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मंगळवारी बदलापुरात काल मंगळवारी जनक्षोभ पाहायला मिळाला. बदलापुरात आज सकाळ तणावपूर्ण शांतता आहे.

तसंच सुरक्षितेच्या कारणास्तव आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. इंटरनेट सेवा देखील बंद आहे. दगडफेक करणे, सरकारी मालमत्तेचे दंगल करून नुकसान करणे आदी कलमांनुसार 300 पेक्षा जास्त आंदोलकांविरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. बदलापुरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी संवेदनशील भागात बंदोबस्तात वाढ केली आहे.

बदलापुरातील अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर काल मंगळवारी घटनेचा निषेध करण्यासाठी जनक्षोभ रस्त्यावर उतरला. आदर्श शाळेसमोर पालकांनी आंदोलन केले. त्यानंतर पालक आणि आंदोलक बदलापूर रेल्वे स्थानकात घुसले आणि रेल रोको आंदोलन केले. आंदोलनाची धार एवढी वाढली की, अख्खं बदलापूर आंदोलनात उतरले. आरोपीला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढली. तरी देखील आंदोलक ठाम होते. दहा तास रेल रोको आंदोलन झाले. पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्याची भूमिका घेताच, जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडजल्या. यानंतर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आंदोलकांशी संवाद साधला. तरी आंदोलक ठाम होते.

Badlapur Rape Case
Badlapur School Case : बदलापूर अत्याचार घटनेचे दिल्लीत पडसाद; बालहक्क आयोग तपासासाठी पथक येणार

आंदोलक तब्बल दहा ते 12 तास रेल्वे स्थानकात तळ ठोकून होते. आंदोलन ठाम असतानाच पोलिसांनी आंदोलनावर गुन्हे दाखल करत होते. यानंतर आंदोलनाभोवती पोलिस (Police) बळ वाढून आंदोलन मोडून काढण्यात आले. पोलिसांनी तब्बल 300 पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे. यात 26 जणांना अटक केली आहे. आजही आंदोलन होईल, यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बदलापुरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

Badlapur Rape Case
Uddhav Thackeray : "भाजप कार्यकर्ते असतील, तर निबंध लिहून सोडणार का?" बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा संताप

ठाकरेसेना घटनेच्या निषेधासाठी मैदानात

या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बदलापुरात पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापुराती संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच सुरक्षितेच्या कारणास्तावर बदलापुरातील शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनं करण्याच्या शक्यतेने मुंबई पोलिस अलर्ट झाली आहे.

केसरकर आणि आंधारे बदलापुरात

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज बदलापुरात दाखल होत आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली, त्या आदर्श शाळेला भेट देण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा आंधारे या देखील पीडित मुलांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यभर आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना गृह विभागाने अलर्ट मोडवर ठेवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com